Shilpa shetty and Raj Kundra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Raj Kundra Tweet: 'आम्ही वेगळे झालो आहोत...', खरंच शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या नात्यात दुरावा आलाय?, ट्विटने उडवली खळबळ

Raj Kundra UT 69 Movie: राज कुंद्राचा आगामी चित्रपट हा त्याच्या आयुष्यावर आणि जेल प्रवासावर आधारित आहे.

Priya More

Shilpa Shetty And Raj Kundra:

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा त्याच्या आगामी बायोपिकमुळे चर्चेत आहे. नुकताच राज कुंद्राच्या UT69 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर रिलीजच्या वेळी तब्बल २ वर्षांनंतर राज कुंद्राने तोंडावर लावलेला मास्क काढला आणि सर्वांना चेहरा दाखवला.

यावेळी राज कुंद्रा कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडला. राज कुंद्राचा आगामी चित्रपट हा त्याच्या आयुष्यावर आणि जेल प्रवासावर आधारित आहे. या चित्रपटामुळे राज कुंद्रा चांगलाच चर्चेत आहे. पण अशामध्ये नुकताच त्याने केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे.

राज कुंद्राने गुरूवारी रात्री उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स म्हणजेच ट्विटरवर एका ट्वीट करत खळबळ उडवून दिली. 'आम्ही वेगळे झालो आहोत आणि कृपया या कठीण काळात आम्हाला वेळ द्या.', असं त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे. त्याच्या या ट्विटनंतर चर्चांना उधाण आले आहे. नेमकं काय झालं आहे हे कोणालाच कळत नाहीये. अशामध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्या नात्यामध्ये दुरावा आलाय का?, खरंच दोघे वेगळे झाले आहेत का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज कुंद्राच्या नवीन सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली असली तरी एकीकडे काही जण दोघे वेगळे होणार असल्याचे बोलत आहे. तर काही जण चित्रपटाच्या प्रमोशनची ही घाणेरडी युक्ती असल्याचेही म्हणत आहेत. पण नेमकं काय झालंय हे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच सांगू शकतो. राजच्या पोस्टनंतर शिल्पा शेट्टी सध्या सोशल मीडियावर या विषयावर काहीही बोललेले नाही. नुकताच राज कुंद्रा ट्रेलर लाँचवेळी माझी मुलं, पत्नी आणि कुटुंबाला काहीही बोलू नका असे बोलला होता आणि आता अचानक असे ट्वीट केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

राज कुंद्राने त्याच्या UT69 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर दोन दिवसांनी ही पोस्ट केली आहे. राज कुंद्रा UT69 या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. राज कुंद्राने त्याच्या बायोपिकमध्ये स्वत:च अभिनय केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक देखील केली होती. सुमारे दोन महिने तुरुंगात राहिल्यानंतर राज कुंद्राचा जामीन मंजूर करण्यात आला होता. याप्रकरणी राज कुंद्रावर अनेक आरोप देखील करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : पुणे हादरलं !सासरवाडीत जाऊन पतीने केली पत्नीची हत्या; धक्कादायक कारण समोर

Shengdana Chikki: श्रावणात खास बनवा शेंगदाणा चिक्की, महिनाभर खाता येईल

Raigad To Arnala Fort: रायगड किल्ल्यावरून अर्नाळा किल्ल्यापर्यंत प्रवास कसा कराल? जाणून घ्या प्रमुख टप्पे आणि टिप्स

Nag Panchami 2025: नाग पंचमीला घरी पूजा कशी करावी?

Maharashtra Live News Update: पुणे शहरातील आणखी एक पूल पाण्याखाली

SCROLL FOR NEXT