बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) या वर्षातला बहुप्रतीक्षित 'डंकी' चित्रपट (Dunki Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाना दिसत आहे. शाहरुख खानचा या वर्षातला हा शेवटचा आणि तिसरा चित्रपट आहे.
यावर्षी बॉलिवूडला 'पठान' आणि 'जवान'सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर नुकताच भेटीला आलेल्या शाहरुख खानच्या डंकीला देखील प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर शाहरुख खानचा डंकी साऊथ सुपरस्टार प्रभासच्या 'सालार' चित्रपटाला टक्कर देत आहे. पहिल्या दिवशी 30 कोटींची ओपनिंग करून डंकी आता तिसऱ्या दिवशी 100 कोटींच्या क्लबजवळ पोहोचला आहे.
२१ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या डंकीबाबत प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे देखील आकडे समोर आले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या 'डिंकी'ने तिसऱ्या दिवशी जवळपास 26 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 75.32 कोटी रुपये झाले आहे. 100 कोटींच्या क्लबपर्यंत पोहचण्यासाठी हा चित्रपट अवघे काही अंतर दूर आहे.
रविवार आणि ख्रिसमसच्या सुट्टीत चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. डंकीने पहिल्या दोन दिवसांत जगभरात 103.40 कोटी रुपयांची कमाई केली होती. शाहरुख खानच्या डंकीची सध्या बॉक्स ऑफिसवर प्रभासच्या सालारसोबत टक्कर होत आहे. सालारने दोन दिवसांमध्ये 145.70 कोटींची कमाई केली आहे. दोन्ही चित्रपटांची एकूण कमाई लक्षात घेता प्रभासचा सालार डंकीच्या पुढे असल्याचे दिसून येत आहे.
शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांवर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती राजकुमार हिरानी आणि गौरी खान यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन अभिजात जोशी, राजकुमार हिरानी आणि कनिका धिल्लन यांनी केले आहे. 'मुन्ना भाई एमबीबीएस' (2003), 'लगे रहो मुन्ना भाई' (2006), '3 इडियट्स' (2009), 'पीके' (2014) आणि 'संजू' (2018) या सुपरहिट चित्रपटानंतर राजकुमार हिरानी यांचा डंकी हा पाचवा चित्रपट आहे. त्यांच्या आधीच्या सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. आता डंकी देखील रेकॉर्डब्रेक कमाई करेल असा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.