Shah Rukh Khan Dunki Film  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dunki New Poster: 'सर्वांना सोबत घेऊन या...', 'डंकी'चे नवीन पोस्टर शेअर करत किंग खानचे चाहत्यांना आवाहन

Priya More

Dunki Movie:

'पठान' (Pathan) आणि 'जवान'च्या (Jawan Movie) जबरदस्त यशानंतर आता बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी 'डिंकी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'पठान' आणि 'जवान'नंतर आता 'डंकी' (Dunki Movie) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. नुकताच शाहरुख खानने सोशल मीडियावर डिंकीचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत शाहरुख खानने दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुपरस्टार शाहरुख खान फिल्म्सने बुधवारी संध्याकाळी उशिरा सोशल मीडियावर डंकीचे नवीन पोस्टर शेअर केले. नवीन पोस्टरसोबत शाहरुख खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हार्डी तयार आहे, त्याची गर्लफ्रेंड मनूसोबत... तुमचे मित्र, भावंडं, कुटुंबाला फ्री ठेवा... सर्वांना सोबत घेऊन या, फक्त दिवस बाकी आहेत आठ! डंकीसाठी 8 दिवस.' शाहरुख खानच्या डंकीचे हे नवीन पोस्टर पाहून चाहत्यांमधील उत्सुकता चारपटीने वाढली आहे.

पोस्टरसोबतच, शाहरुखने गोंडस कॅप्शनसह चित्रपटाच्या रिलीज डेटची उलटी मोजणी सुरू केली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित डंकीचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'मुन्ना भाई', '3 इडियट्स', 'संजू' यासारखे चित्रपट तयार करणाऱ्या राजकुमार हिरानी यांचा डंकी हा नवा चित्रपट आहे. डिंकी कॉमेडीसह ड्रामाचे सुंदर मिश्रण आहे. शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी पहिल्यांदाच डंकीसाठी एकत्र काम करत आहेत.

दरम्यान, राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुख खानचा 'डिंकी' हा चित्रपट 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'डिंकी' चित्रपटात शाहरुख खानशिवाय तापसी पन्नू, विकी कौशल, अनिल ग्रोव्हर आणि बोमन इराणी हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. डंकी हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट मानला जातो. पठान आणि जवानप्रमाणे हा चित्रपट देखील जगभरामध्ये जबरदस्त कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT