Shah Rukh Khan  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: खरंच 'डंकी'नंतर 'धूम 4'मध्ये होणार किंग खानची एन्ट्री?, काय आहे या चर्चेमागचं सत्य

Shah Rukh Khan Part Of Dhoom 4: शाहरुख खान आता 'धूम' फ्रँचायझीच्या चौथा चित्रपट 'धूम 4'मध्ये दिसणार असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुख खानची एन्ट्री होणार असल्यामुळे त्याचे चाहते खूपच उत्सुक आहेत.

Priya More

Dhoom 4 Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) 'बादशाह' शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या 'डंकी'च्या (Dunki Movie) यशाचा आनंद घेत आहे. या वर्षामध्ये शाहरुख खानचे 'पठान', 'जवान' आणि आता 'डंकी' असे बॅक टू बॅक तीन चित्रपट सुपरहिट ठरले. या चित्रपटांनंतर आता किंग खानबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

शाहरुख खान आता 'धूम' फ्रँचायझीच्या चौथा चित्रपट 'धूम 4'मध्ये दिसणार असल्याच्या सध्या चर्चा सुरू आहेत. या चित्रपटामध्ये शाहरुख खानची एन्ट्री होणार असल्यामुळे त्याचे चाहते खूपच उत्सुक आहेत. पण आता समोर आलेल्या बातम्यानुसार शाहरुख खान 'धूम 4' चित्रपटामध्ये दिसणार नाही. याबाबत शाहरुख खान किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. हे वृत्त समोर येताच शाहरुखचे चाहते नाराज झाले आहे.

अभिषेक बच्चन स्टारर सिरीज 'धूम 4' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खान 'धूम'च्या पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 मध्ये दिसले आहेत. तर अभिषेक बच्चनने तिन्ही भागांमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आता सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, शाहरुख खान धूम 4 मध्ये एन्ट्री करणार आहे. त्यानंतर शाहरुख खानच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करण्यास सुरूवात केली. पण अद्याप शाहरुखबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे खरंच शाहरुख खान या चित्रपटामध्ये दिसणार की नाही याची निर्मात्यांकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच समजेल.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, 'धूम 4' मध्ये शाहरुख खानच्या एन्ट्रीबाबत अद्याप कोणताही स्पष्ट अहवाल आलेला नाही. निर्मात्यांकडून याबाबत स्पष्टपणे काहीही सांगण्यात आले नाही. 'धूम 4'च्या मेकिंगवर सध्या काम सुरू झाले आहे. मात्र स्टारकास्टबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यापूर्वी समोर आलेल्या अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले होते की, शाहरुख खान आणि साऊथ स्टार राम चरण 'धूम 4'चा भाग असणार आहेत.

धूम फ्रँचायझीचा पहिला चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय गढवी यांनी केले होते आणि विजय कृष्ण आचार्य यांनी चित्रपटाची कथा लिहिली होती. आदित्य चोप्राच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, उदय चोप्रा, ईशा देओल आणि रिमी सेन यांनी भूमिका केल्या होत्या. यानंतर 2006 साली 'धूम 2' चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये हृतिक रोशन चोराच्या भूमिकेत दिसला होता. 2013 मध्ये 'धूम 3' चित्रपट प्रदर्शित झाला. ज्यामध्ये आमिर खानने काम केले होते. आता सोशल मीडियावर 'धूम 4'ची चर्चा रंगली असून यात शाहरुख खान एन्ट्री करणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT