Salaar Vs Dunki Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Salaar Vs Dunki Collection Day 8: शाहरुखच्या 'डंकी'पेक्षा प्रभासचा 'सालार'च भारी, इतिहास रचत केली इतक्या कोटींची कमाई

Salaar And Dunki Worldwide Collection: डंकी चित्रपट सालारच्या आधी रिलीज झाला असला तरी देखील कमाईच्या बाबतीत सालारने डंकीला मागे टाकत बाजी मारली आहे. बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही चित्रपट दमदार कमाई करत आहेत.

Priya More

sSalaar And Dunki Box Office Collection:

बॉलिवूडचा (Bollywood) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki Movie) आणि साऊथ सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) 'सालार' चित्रपट (Salaar Movie) बॉक्स ऑफिससोबत जगभरामध्ये धुमाकूळ घालत आहे. डंकी आणि सालार या दोन्ही चित्रपटांमध्ये सध्या टक्कर सुरू आहे. डंकी चित्रपट सालारच्या आधी रिलीज झाला असला तरी देखील कमाईच्या बाबतीत सालारने डंकीला मागे टाकत बाजी मारली आहे. बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही चित्रपट दमदार कमाई करत आहेत. अशामध्ये या चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत...

शाहरुख खानचा नुकताच प्रदर्शित झालेला 'डंकी' हा चित्रपट प्रभासच्या सालार चित्रपटाच्या तुलनेमध्ये कमाईमध्ये खूपच मागे आहे. सालार डंकीच्या तुलनेत बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवत आहे. डंकी सालारला टक्कर जरी देत असला तरी देखील चित्रपटाची कमाई अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. शाहरुख खानच्या या वर्षातील दोन सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर 'पठान' आणि 'जवान'च्या तुलनेत डंकी चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये.

शाहरुख खानचा 'डंकी' चित्रपट प्रदर्शित होऊन आठ दिवस झाले असून या चित्रपटाने 200 कोटींचा आकडाही पार केलेला नाही. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, 'डिंकी'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 29.20 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 20.12 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 30.70 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 24.32 कोटी रुपये, सहाव्या दिवशी 11.56 कोटी रुपये आणि सातव्या दिवशी 10.50 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाच्या आठव्या दिवशीच्या कमाईचा आकडा समोर आला आहे. डंकीने आठव्या दिवशी 9 कोटींची कमाई केली आहे. अशापद्धतीने डंकीने रिलीजच्या आठव्या दिवशी 161.01 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंतचा डंकीचा कमाईचा आकडा हा खूपच निराशजनक आहे. तर डंकीने जगभरामध्ये 305 कोटींची कमाई केली आहे.

प्रभासच्या सालार चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचे झाले तर, 'सालार' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 90.70 कोटींची भरघोस कमाई केली. दुसऱ्या दिवशी 56.35 कोटी रुपये, तिसऱ्या दिवशी 62.5 कोटी रुपये, चौथ्या दिवशी 46.30 कोटी रुपये, पाचव्या दिवशी 24.90 कोटी रुपये, सहाव्या दिवशी 15.1 कोटी रुपये आणि सातव्या दिवशी 13.50 कोटी रुपयांची कमाई केली. अशापद्धतीने सालारने रिलीजच्या सात दिवसापर्यंत 308.90 कोटींची जबरदस्त कमाई केली आहे. सालारने जगभरात देखील बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाने ७ दिवसांमध्ये जगभरामध्ये 521.85 कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT