Dunki Drop 3 New Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dunki Drop 3 New Song: 'डंकी'मधील 'निकले थे कभी हम घर से' गाणं रिलीज, शाहरुख-तापसीला रडताना पाहून चाहते इमोशनल

Nikle The Kabhi Hum Ghar Se Song Out: 'पठान' आणि 'जवान'नंतर आता 'डंकी' (Dunki Movie) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

Priya More

Dunki Movie:

'पठाण' (Pathan) आणि 'जवान'च्या (Jawan Movie) ब्लॉकबस्टर यशानंतर आता बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या आगामी 'डिंकी' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'पठान' आणि 'जवान'नंतर आता 'डंकी' (Dunki Movie) देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये डंकीमधील दुसरं गाणं रिलीज झाले आहे. ज्याला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शाहरुख खान आणि तापसी पन्नू यांचा 'डंकी' 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाच्या प्रत्येक अपडेटसाठी चाहते उत्सुक आहेत. आता शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटाचे नवीन अपडेट समोर आले आहे. निर्मात्यांनी 'डिंकी ड्रॉप 3'मधील दुसरं गाणं रिलीज केलं आहे. हे गाणं सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. 'निकले थे कभी हम घर से' हे डंकी चित्रपटातील दुसरं गाणं आहे. हे गाणं खूपच भावनिक आहे. यामधील शाहरुख आणि तापसीला पाहून चाहते इमोशनल झाले आहेत.अवघ्या काही तासांमध्येच सोशल मीडियावर हे गाणं लोकप्रिय झाले आहे.

शाहरुख खानच्या 'डंकी' चित्रपटातील 'निकले थे कभी हम घर से' हे नवीन गाणं शुक्रवारी रिलीज झाले आहे. हे गाणं ऐकून तुम्ही देखील भावूक व्हाल. हे गाणे जावेद अख्तर यांनी लिहिले असून सोनू निगमने गायले आहे. हे गाणं प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. शाहरुख खानने हे गाणं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. शाहरुख खानने या गाण्यासोबत खास मेसजही लिहिला आहे.

या पोस्टमध्ये शाहरुख खानने लिहिले की, 'आज असंच मनामध्ये हे गाणं आलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. नावावरून राजू आणि सोनू हे आपल्यापैकीच एक आहेत असं वाटत आहे. हे गाणं या दोघांनी बनवलं आहे आणि ते ही आपलेच आहे. आपल्या घरच्यांचे आहे...आपल्या मातीचे आहे... आपल्या देशाच्या भूमीतील शांततेसाठी आहे...कधी कधी आपण सगळेच आपल्या घरापासून, गावापासून, शहरापासून दूर जातो, आयुष्य घडवायला. पण आपले हृदय आपल्या घरात, देशातच असते.'

दरम्यान, राजकुमार हिरानी दिग्दर्शित शाहरुख खानचा 'डिंकी' हा चित्रपट 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिरानी आणि शाहरुख खान हे या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. 'डिंकी' चित्रपटात शाहरुख खानशिवाय तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devshayani Ekadashi: देवशयनी एकादशीचं काय आहे महत्त्वं? जाणून घ्या पूजेची योग्य वेळ

Satara Crime : घरकाम करणाऱ्या महिलेने मारला डल्ला; दहा तोळे सोने लांबवीले, महिलेला पोलिसांनी केली अटक

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Asteroid Scare : कुतुबमिनारपेक्षा ९ पट मोठा लघुग्रह पृथ्वीवर धडकणार | VIDEO

GK: जुन्या रेल्वे डब्यांचा वापर रेल्वे कसा आणि कुठे करते? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT