Preity Zinta And Shah Rukh Khan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

२ दिवस मी झोपलेच नाही..., शाहरुख खानसोबतचा व्हिडीओ शेअर करत Preity Zintaने सांगितला किस्सा

Preity Zinta And Shah Rukh Khan Video: सोशल मीडियावर शाहरुख खान-प्रीति झिंटा यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये दोघांनी 'विर-जारा' चित्रपटातील 'तेरे लिए हमभी जिए...' या गाण्यावर रोमँटिक डान्स केला आहे.

Priya More

Preity Zinta And Shah Rukh Khan Dance:

यशराज बॅनरखाली तयार करण्यात आलेला आणि बॉलिवूडचा (Bollywood) अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री प्रीति झिंटा यांचा 'वीर- जारा' (Veer- Zaara Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. 'वीर-जारा' हा सर्वात चांगल्या रोमँटिक चित्रपटांपैकी एक आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाला आता २० वर्षे पूर्ण होणार आहेत. अशामध्ये सोशल मीडियावर शाहरुख खान-प्रीति झिंटा यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये दोघांनी 'विर-जारा' चित्रपटातील 'तेरे लिए हमभी जिए...' या गाण्यावर रोमँटिक डान्स केला आहे.

प्रीति झिंटाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शाहरुखसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'विर-जारा' चित्रपटातील 'तेरे लिए हमभी जिए...' या सुहरहिट गाण्यावर दोघांनी जबरदस्त डान्स केला आहे. प्रीति आणि शाहरुखचा हा थ्रोबॅक व्हिडीओ आहे. त्यांच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रीति झिंटा आणि शाहरुख खानच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे.

हा व्हिडीओ शेअर करत प्रीति झिंटाने लिहिले की, 'आम्ही एका अवॉर्ड शोसाठी रिहर्सल करत होतो. मला आठवते की, 'मला 2 दिवस झोप लागली नाही आणि मला झोम्बीसारखे वाटत होते. शाहरुख खानने त्याच्या अगदी मोहक आणि विनोदांच्या माध्यमातून तो दिवस आणि रिहर्सल उज्वल करण्यासाठी मदत केली. त्याने मला पकडले आणि आम्ही जी स्टेप केली ती जिया जलेमध्ये आम्ही केली होती.'

'वीर-जारा' या चित्रपटामध्ये शाहरुख खानने भारतीय वायु दलाचे पायलट वीर प्रताप सिंह यांची आणि प्रीति झिंटाने पाकिस्तानी मुलगी जारा ह्यात खानची भूमिका साकारली होती. २००४ साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील शाहरुख आणि प्रीति यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला होता. या चित्रपटामध्ये शाहरुख खान, प्रीति झिंटा व्यतिरिक्त राणी मुखर्जी, दिव्या दत्ता, मनोज वाजपेयी, अखिलेंद्र मिश्रा, अनुपम खेर हे कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत. वीर-जारा चित्रपटाचा आजही मोस्ट रोमँटिक चित्रपटाच्या लिस्टमध्ये समावेश होतो. या चित्रपटाला २००५ मध्ये सर्वश्रेष्ठ लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड

SCROLL FOR NEXT