Salman Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant Ambani- Radhika Merchant च्या प्री-वेडिंगसाठी सलमान खान जामनगरमध्ये, चाहते म्हणाले- 'गुजरातमध्ये टायगरचं स्वागत'

Anant Ambani- Radhika Merchant : बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानही (Salman Khan) जामनगरला दाखल झाला आहे. सलमान खानचा व्हिडिओ समोर आला असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर सलमान खानच्या चाहत्यांनी कमेंट्स करण्यास सुरूवात केली आहे.

Priya More

Anant Ambani- Radhika Merchant Pre- Wedding:

देशाचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत लग्न (Anant Ambani- Radhika Merchant Wedding) करणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग फंक्शन्सला बुधवारपासून सुरूवात झाली आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूड सेलिब्रिटी देखील हजेरी लावणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यकमासाठी बॉलिवूड स्टार्सही जामनगरला पोहोचले आहेत.

बॉलिवूडचा 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खानही (Salman Khan) जामनगरला दाखल झाला आहे. सलमान खानचा व्हिडिओ समोर आला असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर सलमान खानच्या चाहत्यांनी कमेंट्स करण्यास सुरूवात केली आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. सलमान खानचा जलवा त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटी येणार आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी सलमान खानही जामनगरला पोहोचला आहे. सलमान खान विमानतळावरून बाहेर येतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओवर सलमान खानचे चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंट्समध्ये लिहिले की, 'गुजरातमध्ये टायगरचं स्वागत' दुसऱ्या चाहत्याने लिहले की, 'भाईची झलक सर्वात वेगळी आहे.' तिसऱ्या चाहत्याने लिहिले आहे की, 'भाईजानचा जलवा एकतर्फी आहे.' आणखी एका चाहत्याने लिहिले की, 'या व्यक्तीचे वय का वाढत नाही?'

शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, कतरिना कैफ, विकी कौशल, करण जोहर, मनीष मल्होत्रा, जान्हवी कपूर, अरिजित सिंग, दिलजीत दोसांझ, हरिहरन, प्रीतम अंबानी यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात. त्याचबरोबर हॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमामध्ये शाही व्यवस्था असणार आहे. यासोबतच मुकेश अंबानी आणि नीता अंबानी जामनगरमध्ये अन्नससेवा करत आहेत. जवळपास ५१ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी या अन्नसेवामध्ये जेवणाचा आनंद घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT