Firecrackers Burst In Theater Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malegaon Tiger 3: मालेगावात सलमान खानच्या चाहत्यांची हुल्लडबाजी, 'टायगर ३' बघताना थिएटरमध्ये फोडले फटाके

Firecrackers Burst In Theater: मालेगावमध्ये सलमान खानच्या चाहत्यांनी हुल्लडबाडी करत थिएटरमध्येच फटाके फोडल्याची घटना समोर आली आहे.

Priya More

Tiger 3 Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चित्रपट म्हटलं तर त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणी असते. सलमान खानच्या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. नुकताच सलमान खानचा बहुप्रतीक्षित 'टायगर ३' चित्रपट (Tiger 3) दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झाला.

हा चित्रपट पाहण्यासाठी राज्यभरातील थिएटरमध्ये चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे. अशामध्ये मालेगावमध्ये सलमान खानच्या चाहत्यांनी हुल्लडबाडी करत थिएटरमध्येच फटाके फोडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या मालेगावातील चित्रपटगृहामध्ये सलमान खानचा टायगर ३ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली. अशातच थिएटरमध्ये काही टवाळखोरांनी हुल्लडबाजी करत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केल्याची घटना घडली. मालेगावच्या मोहन चित्रपटगृहात ही घटना घडली. चित्रपट पाहताना टायगरची एन्ट्री होताच काही टवाळखोरांनी थेट थिएटरमध्ये फटाके फोडून गोंधळ घातला.

ही घटना रविवारी रात्री घडली. टायगर ३ चा हा शो रात्री ९ ते १२ वाजेपर्यंतचा होता. हा चित्रपट पाहण्यासाठी सलमानच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. चित्रपट सुरू झाल्यानंतर टायगरची म्हणजे सलमान खानची धांसू एन्ट्री होते. त्यातच चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या काही टवाळखोरांनी थिएटरमध्ये मोठ-मोठे फटाके फोडले. यामुळे चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या इतर प्रेक्षकांचा एकच गोंधळ उडाला. थिएटरमध्ये प्रेक्षकांची पळापळ झाली.

या टवाळखोरांनी अचानक थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे इतर प्रेक्षक घाबरले. हा चित्रपट पाहण्यासाठी लहान मुलं देखील आपल्या पालकांसोबत आले होते. या टवाळखोरांच्या कृत्यामुळे त्यांना देखील त्रास झाला. ऐवढंच नाही तर फटाके फोडतांना थिएटरला आग लागू शकते याचे भान सुध्दा या हुल्लडबाजांना राहिले नव्हते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या हुल्लडबाजांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT