Tiger 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 Movie: सलमान खानचं टेन्शन वाढलं, सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या या देशात 'टायगर ३' वर बंदी

Tiger 3: दिवाळीच्या (Diwali 2023) शुभ मुहूर्तावर सलमान खानचा 'टायगर ३' चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Priya More

Tiger 3 Ban Islamic State:

बॉलिवूडचा (Bollywood) 'सुलतान' अर्थात अभिनेता सलमान खान (Salman Khan) आगामी 'टायगर ३' (Tiger 3) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे.

दिवाळीच्या (Diwali 2023) शुभ मुहूर्तावर त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सलमानचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर परदेशातही आहे. त्यामुळे त्याचे परदेशातील चाहते देखील या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

जगातील सर्व इस्लामिक देशांमध्ये सलमानचे करोडो चाहते आहेत. असे असले तरी तीन आखाती देशांतील त्याच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. कारण सलमान खानच्या टायगर 3 वर या देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. यामागे पाकिस्तानचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' या ऐतिहासिक चित्रपटावरही या इस्लामिक देशांनी बंदी घातली होती. कुवेत, कतार आणि ओमान या देशांमध्ये अक्षयच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती. आता याच देशांनी सलमान खानच्या टायगर 3 वर देखील बंदी घातली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'टायगर 3' वर बंदी घालण्याबाबत सांगितले जात आहे की या चित्रपटातील दृश्ये तुर्की, रशिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये शूट करण्यात आली आहेत. ज्यामध्ये सलमान खान जागतिक दहशतवादी संघटनेशी लढताना दाखवण्यात आला आहे. जे इस्लामिक देशांशी संबंधित आहेत. काही इस्लामिक देश आणि त्यांच्या लोकांच्या नकारात्मक चित्रणामुळे कुवेत, ओमान आणि कतार या देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटात टायगरचा पाकिस्तानविरुद्धचा लढा दाखवण्यात आला असून तेथून प्रायोजित होणारा दहशतवाद हे काही देशांच्या नाराजीचे कारण असल्याचे देखील बोलले जात आहे.

इस्लामिक देशांमध्ये टायगर ३ वर बंद घालण्यात आल्याबद्दल चित्रपटाच्या निर्माते आणि दिग्दर्शनकांनी यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण या बंदीमुळे टायगर ३ च्या परदेशातील कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण आखाती देश हे बॉलिवूडमधील चित्रपटांना चांगली कमाई करण्यासाठी महत्वाची बाजारपेठ असल्याचे सांगितले जाते. सलमान खानचा टायगर ३ दिवळीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे १२ नोव्हेंबरला जगभरात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

SCROLL FOR NEXT