बॉलिवूडचे (Bollywood) प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) सध्या त्यांच्या बहुप्रतिक्षित पीरियड ड्रामा 'हिरामंडी: द डायमंड बझार'मुळे चर्चेत आहेत. या मालिकेद्वारे ते ओटीटीवर पदार्पण करणार आहेत. या वेबसीरिजची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. संजय लीला भन्साळींच्या या मालिकेत मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), आदिती राव हैदरी (Aadity Rao Hydri), रिचा चड्ढा (Richa Chadha), संजीदा शेख आणि शर्मीन सहगल मु्ख्य भूमिकेत दिसणार आहेत.
हिरामंडी वेबसीरिजची सध्या चांगलीच चर्चा होत असून या वेबसीरिजच्या बाबतीत नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत. या वेबीसीरिजबाबत अभिनेत्री रिचा चड्ढाने महत्वाचा खुलासा केला आहे. या वेबसीरिजमध्ये वास्तवाची झलक देण्यासाठी संजय लीला भन्साळींनी वेशभूषेवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. या वेबसीरिजमध्ये मूळ जुने आणि खरे दागिने तसंच कपडे वापरण्यात आले असल्याचे रिचाने सांगितले.
सिनेविस्टार इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2024 (CIFF) दरम्यान रिचाने 'हिरामंडी'शी संबंधित अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी तिने सांगितले की, आम्ही घातलेले सर्व दागिने खरे आहेत. जरी ते तीन-चार किलोचे दागिने असले तरी ते सर्व खरे आणि सर्व जुने दागिने आहेत. यामध्ये जुन्या कपड्यांचा वेशभूषा म्हणून वापर करण्यात आला आहे.
या वेबसीरिजमध्ये रिचा चड्ढा 'लज्जो'च्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना रिचाने सांगितले की, 'भूमिकेत बसण्यासाठी मला उर्दूचे अनेक क्लासेस घ्यावे लागले. त्यामुळे मला त्यात सुधारणा करावी लागली. मी लहान असताना एक दशक कथ्थक शिकले. मी माझ्या पात्रासाठी व्हॉईस मॉड्युलेशन केले आहे. 1930, 1940 आणि 1950 च्या दशकात स्त्रिया कशा बोलायच्या हे मी माझ्या भाषणात आणण्याचा प्रयत्न केला. त्या संवादात एक वेगळीच लय होती.'
संजय लीला भन्साळी यांचा हिरामंडी ही वेबसीरिज 1 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होणार आहे. निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वी या वेबीसीरिजमधील सर्व अभिनेत्रींचा फर्स्ट लूक शेअर केला होता. सर्व अभिनेत्री पारंपारिक पोशाखात खूपच सुंदर दिसत होत्या. या वेबसीरिजमधील पहिलं गाणं 'सकल बन' रिलीज झाले आहे. त्यामध्ये सर्व अभिनेत्री क्लासिकल डान्स करताना दिसल्या. प्रेक्षक आता या वेबीसिरिजची आतुरतेने वाट पाहत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.