लग्नात बूट चोरल्यानंतर Ranbir Kapoor ने मेहुणींना खरंच 12 कोटी रुपये दिले होते?, कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितलं सत्य

Ranbir Kapoor And Alia Bhatt Wedding: आपल्या लग्नामध्ये रणबीरने आलियाच्या मेहुणींना बूट चोरल्यानंतर 11-12 कोटी रुपये दिल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या. पण खरंच रणबीरने मेहुण्यांना १२ कोटी रुपये दिले होते का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता.
Ranbir Kapoor And Alia Bhatt Wedding
Ranbir Kapoor And Alia Bhatt WeddingSaam Tv

Ranbir Kapoor And Alia Bhatt:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) १४ एप्रिल २०२२ मध्ये आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) लग्न केले. या कपलने ग्रँड वेडिंगऐवजी कुटुंबीय आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत मुंबईतल्या घरामध्येच लग्न केले. आपल्या लग्नामध्ये रणबीरने आलियाच्या मेहुणींना बूट चोरल्यानंतर 11-12 कोटी रुपये दिल्याच्या अनेक बातम्या आल्या होत्या. पण खरंच रणबीरने मेहुण्यांना १२ कोटी रुपये दिले होते का? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. अशात नुकताच रणबीरने कपिल शर्माच्या शोमध्ये यामागचे सत्य सांगितले आहे. तसेच त्याने आपल्या मेहुण्यांना किती पैसे दिले हे देखील सांगितले.

कपिल शर्माचा शो 'द ग्रेट इंडियन कपिल' 30 मार्चपासून OTT प्लॅटफॉर्म Netflix वर एका नवीन फॉर्ममध्ये आणि शैलीत सुरू झाला आहे. पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूरने आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा साहनीसोबत गेस्ट म्हणून हजेरी लावली. तिघांनीही शोमध्ये अनेक मजेशीर किस्से शेअर केले आणि सर्वांना हसवले. दुसरीकडे, गुत्थीची भूमिका करणाऱ्या सुनील ग्रोवरपासून कपिलच्या टीममधील इतर कलाकारांपर्यंत सर्वांचे खूप मनोरंजन झाले.

या शोमध्ये कपिल शर्माने रणबीरला विचारले की, त्याने बूट चोरल्यानंतर मेहुण्यांना 11-12 कोटी रुपये दिले होते का? यावर उत्तर देताना रणबीर कपूर म्हणाला की, आलियाच्या बहिणींनी कधीच करोडो रुपये मागितले नव्हते. बूट चोरण्यासाठी त्यांनी काही लाख रुपये मागितले होते. पण रणबीरच्या म्हणण्यानुसार, त्याने बार्गेनींग करत करत ही रक्कम काही हजार रुपयांपर्यंत खाली आणली. त्यानंतर रणबीरने बूट परत घेण्यासाठी आपल्या मेहुण्यांना हजार रुपये दिले होते. रणबीर पुढे म्हणाला, 'आमचे लग्न घरीच झाले होते. त्यामुळे बूट चोरीला गेला असता तर मी घरीच थांबलो असतो.'

रणबीर कपूरने 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये अनेक किस्से सांगितले. रणबीरने पुढे सांगितले की, 'तो त्याच्या मैत्रिणींना आई नीतू कपूरचे दागिने भेट देत असे. रणबीर आता मुलगी राहाचा वडील झाला आहे आणि त्याच्या वैवाहिक आयुष्यात खूप आनंदी आहे. रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणबीर लवकरच नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात दिसणार आहे. २ एप्रिलपासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होत आहे.

Ranbir Kapoor And Alia Bhatt Wedding
Priyanka Chopra चा भारत दौरा संपला, निक आणि मालतीसोबत सासरी परतली; एअरपोर्टवरील VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com