Accident Or Conspiracy Godhra Movie Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Godhra Teaser: २२ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार गोध्राची कथा, 'Accident Or Conspiracy Godhra' चा अंगावर काटा आणणारा टीझर आऊट

Watch Godhra Movie Teaser: 22 वर्षांनंतर गुजरातमधील गोध्रा हत्याकांड आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. लवकरच 'एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा' हा चित्रपट (Accident Or Conspiracy Godhra Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Priya More

Accident Or Conspiracy Godhra Movie Teaser:

2002 मध्ये गुजरातमध्ये (Gujarat) झालेल्या गोध्रा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत 'चांद बुझ गया', 'परजानिया', 'फिराक' सारखे चित्रपट आणि माहितीपट तयार करण्यात आले. आता 22 वर्षांनंतर गुजरातमधील गोध्रा हत्याकांड आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. लवकरच 'एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा' हा चित्रपट (Accident Or Conspiracy Godhra Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर आज लाँच करण्यात आला आहे.

अभिनेता रणवीर शौरी आणि मनोज जोशी यांनी या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. 'एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा' या चित्रपटाचा टीझर नुकताच निर्मात्यांनी लाँच केला. अभिनेता रणवीर शौरीने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. त्याने टीझर शेअर करत लिहिले की, #GodharaTeaser हे सर्व तुमचे आहे! हा अपघात किंवा षडयंत्र असेल तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.' रणवीरने ही पोस्ट करत प्रेक्षकांना आवाहन केले आहे.

आजही प्रेक्षकांना 2002 हे वर्ष चांगलेच आठवत असेल. गुजरातच्या गोध्रामध्ये घडलेल्या या घटनेची खरी कहाणी आपल्याला 'एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा' या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या 1 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर शौरी, पंकज जोशी हे प्रतिभावान कलाकार आहेत. 'एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा'हा चित्रपट पीडितांच्या न्यायासाठी लढण्याचा प्रवास दाखवतो.

चित्रपटात, रणवीर शौरीने एका वकिलाची भूमिका साकारली आहे. जो गोध्रा ट्रेन आगीत पीडितांच्या बाजूने लढताना दिसतो. चित्रपटाचे दिग्दर्शन एमके शिवाक्ष यांनी केले आहे. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्राहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्सप्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत 59 जणांचा मृत्यू झाला होता. या वेदनादायक घटनेला गुजरात दंगल असेही म्हणतात. ही घटना गोध्रा हत्याकांडाने देखील ओखळली जाते.

सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाच्या टीझर व्हायरल होत आहे. नेटिझन्स देखील या टीधरचे खूप कौतुक करताना दिसत आहे. एका यूजरने लिहिले की, 'सत्य घटनांवर नक्कीच चित्रपट बनवायला हवा.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'या दंगलींना घटना म्हणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.' तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'बॉलिवूड आता या घटनांवर चित्रपट बनवत आहे याचा आनंद आहे. लोकांना सर्व गोष्टी माहित असाव्यात.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

Astrology: आजपासून 'या' राशींचे दिवस चमकणार, शनीची साडीसती संपणार

SCROLL FOR NEXT