Madgaon Express And Swatantrya Veer Savarkar Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Box Office Collection: 'मडगांव एक्स्प्रेस' सुसाट, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाला मागे टाकत केली इतकी कमाई

Priya More

Madgaon Express Box Collection:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डाचा (Randeep Hooda) 'स्वातंत्रवीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar Movie) आणि कुमार खेमूचा 'मडगांव एक्सप्रेस' (Madgaon Express Movie) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट हळूहळू कमाईमध्ये एक-एक टप्पा पार करताना दिसत आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन १० दिवस पूर्ण झाले.

रविवारी मात्र या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. तर दुसरीकडे कुणाल खेमूच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'मडगांव एक्स्प्रेस' बॉक्स ऑफिसवर सुसाट धावत आहे. मडगांव एक्स्प्रेसने कलेक्शनच्याबाबतीत स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाला मागे टाकले आहे. दोन्ही चित्रपटांनी आतापर्यंत किती कमाई केली हे आपण जाणून घेणार आहोत...

Sacnilk च्या वृत्तानुसार, 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटाने रविवारी अजय देवगण आणि आर माधवनच्या हॉरर थ्रिलर चित्रपट 'शैतान' चित्रपटा ऐवढी कमाई केली. या चित्रपटाने दुसऱ्या रविवारी 1.90 कोटींची कमाई केली. 10 दिवसांत या चित्रपटाची कमाई 15.85 कोटींच्या आसपास पोहोचली आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने वर्ल्डवाइड देखील चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने वर्ल्डवाइडमध्ये काल फक्त 1.50 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाने वर्ल्डवाइडमध्ये 20 कोटींचा आकडा पार केला आहे.

तर दुसरीकडे कुणाल खेमू दिग्दर्शित 'मडगांव एक्स्प्रेस' या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर पहिल्या दिवसापासून हा चित्रपट चांगले प्रदर्शन करताना दिसत आहे.या चित्रपटाने रणदीप हुड्डाच्या चित्रपटाला मागे टाकले आहे. आता गेल्या काही दिवसांत खेळ बदलला असून मडगांव एक्स्प्रेसची कमाई देखील कमी झाली आहे. रविवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1.45 कोटी रुपयांची कमाई केली असून एकूण 17.10 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर जगभरात या चित्रपटाने 22 कोटींचा गल्ला गाठला आहे.

दरम्यान, 'योद्धा', 'शैतान' आणि 'आर्टिकल 370' हे चित्रपट देखील थिएटरमध्ये अजूनही सुरू आहेत. त्यामुळे 'मडगांव एक्सप्रेस' आणि 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाच्या कमाईत वाढ होताना दिसत नाही. या दोन चित्रपटांसोबत सध्या बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा 'शैतान' चित्रपट देखील चांगला चालत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 138 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' चित्रपटाने आतापर्यंत 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' चित्रपटाने 65.94 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. तर 100 कोटींचे वर्ल्डवाइड कलेक्शन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT