Animal Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

'Animal'मधील रणबीर आणि रश्मिकाच्या इंटिमेट सीन्सवर सेन्सॉर बोर्डाची कात्री, या हिंदी शब्दावरही आक्षेप

Animal Movie Intimate Scene Cut By Censor Board: 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि रणबीर कपूर यांनी बरेच किसिंग सीन दिले आहेत. त्यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे.

Priya More

Animal Movie:

बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) स्टारर 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाच्या रिलीजची सर्वजण वाट पाहत आहेत. अशामध्ये या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना आणि रणबीर-रश्मिकाला मोठा धक्का बसला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्नासोबत 'अ‍ॅनिमल'ची संपूर्ण टीमच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या रिलीजपूर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये साऊथचे अनेक मोठे स्टार्स दिसले. 'अ‍ॅनिमल' चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि रणबीर कपूर यांनी बरेच किसिंग सीन दिले आहेत. त्यावर आता आक्षेप घेण्यात आला आहे. चित्रपटातील या सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली आहे. त्याचसोबत एका हिंदी शब्दावर देखील सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 'अ‍ॅनिमल'ला ए सर्टिफिकेट देण्यासोबतच सेन्सॉर बोर्डाने काही सीन्स हटवण्यास सांगितले आहे. सेन्सॉर बोर्डाने रणबीर-रश्मिकाच्या क्लोज-अप किसिंग सीनसह काही संवाद बदलले आहेत. काही हिंदी शब्द बदलण्याची मागणीही सेन्सॉर बोर्डाने केली आहे. या चित्रपटात अनेक दृश्ये आहेत जी अत्यंत हिंसक आहेत. त्यामुळे १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती 'अ‍ॅनिमल' चित्रपट पाहू शकणार नाहीत.

दरम्यान, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट येत्या 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटातील रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांचा लूक प्रेक्षकांना खूप आवडला. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी सर्वजण खूपच उत्सुक आहेत. या चित्रपटाने रिलीज होण्यापूर्वीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगद्वारे जबरदस्त कमाई केली आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगवरूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करेल असा अंदाज लावला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT