Animal Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Animal Advance Booking: रिलीजपूर्वीच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून 'अ‍ॅनिमल'ची बक्कळ कमाई, एका तिकिटाची किंमत ऐकून बसेल धक्का

Animal Advance Booking Collection: या चित्रपटाचा ट्रेलर पाहून सर्वजण चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे.

Priya More

Animal Movie:

बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या 'अ‍ॅनिमल' (Animal) या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून पसंती मिळत आहे. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर आणि नुकताच रिलीज झालेला ट्रेलर सर्वांना प्रचंड आवडला. रणबीर कपूर, बॉबी दओलच्या लूकला सर्वांकडून चांगली पसंती मिळाली. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून सर्वजण चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. रिलीज होण्यापूर्वीच या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'अ‍ॅनिमल' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी त्याची चांगलीच हवा आहे. प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत असलेली उत्सुकता लक्षात घेता निर्मात्यांनी रिलीजच्या सहा दिवस आधी 25 नोव्हेंबरपासून अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू केले. या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी 3.5 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. तर संपूर्ण भारतात 1.2 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री झाली आहे.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात रणबीर कपूरचा वेगळा अवतार पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच रणबीर ग्रे शेड भूमिका साकारताना दिसणार आहे. रणबीर कपूर याआधी कधीही अशी भूमिका साकारताना दिसला नसल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटातील रणबीर कपूरचा नवा अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

'या चित्रपटाची 24 तासांपेक्षा कमी कालावधीत 1 लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. याशिवाय या चित्रपटाने 3.5 कोटींहून अधिक कमाई केल्याचेही बोलले जात आहे.', असे चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत सांगितले. 'अ‍ॅनिमल'ची हायप एवढी असेल तर अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत हा चित्रपट 'गदर 2' आणि 'जवान' सारख्या चित्रपटांना टक्कर देऊ शकतो.

दिल्ली-एनसीआरमध्ये 'अ‍ॅनिमल' तिकिटाची किंमत 250 रुपयांपासून सुरू होते आणि रिक्लिनर सीटसाठी 2400 रुपयांपर्यंत जाते. मल्टिप्लेक्समधील सर्वसाधारण जागांसाठी तिकीट दर 600 रुपयांपर्यंत आहे. मुंबईतल्या तिकीटाच्या किमती जवळपास सारख्याच आहेत. काही ठिकाणी या चित्रपटाच्या तिकीटाची किंमत 2200 रुपयांपर्यंत आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी, शक्ती कपूर आणि प्रेम चोप्रा हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT