Rakhi Sawant On Poonam Pandey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Video: 'वेडी आहेस का तू? असं कोण...', पूनम पांडेवर संतापली राखी सावंत

Rakhi Sawant On Poonam Pandey: पूनम पांडेने मृत्यूबाबत खोटी बातमी पसरवल्यामुळे आता सर्वजण तिच्यावर राग व्यक्त करत आहे. बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने (Rakhi Sawant) सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पूनमच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

Priya More

Poonam Pandey Death:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री पूनम पांडेने (Poonam Pandey) स्वत:च्या निधनाबाबतची खोटी बातमी सांगत सर्वांना मोठा धक्का दिला होता. शुक्रवारी पूनम पांडेचे गर्भाशयाच्या कॅन्सरने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. या बातमीमुळे पूनमच्या चाहत्यांसोबत संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला. अनेक बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट करत पूनम पांडेच्या निधनावर दु:ख व्यक्त केले होते. पण पूनम पांडेने रविवारी एक व्हिडीओ पोस्ट करत आपण जीवंत असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांना आश्चर्यचा धक्का बसला. पूनम पांडेने मृत्यूबाबत खोटी बातमी पसरवल्यामुळे आता सर्वजण तिच्यावर राग व्यक्त करत आहे. बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतने (Rakhi Sawant) सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत पूनमच्या या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

राखी सावंत ही पूनम पांडेची चांगली मैत्रिण आहे. पण पूनमच्या या कृतीवर तिने राग व्यक्त केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत सांगितले की, 'पूनम पांडे तू तर आमचा जीव घेतला. तू वेडी आहेस का, असं कोण पब्लिसिटी स्टंट करते मरण्याचे. तू मीडियावाल्याशी खेळलीस, तू चाहत्यांशी खेळलीस, तू माझ्या हृदयाशी खेळलीस. तू असा खेळ का केलास? आणि मग व्हिडीओ बनवून मी जिवंत आहे असे सांगते. असा घाणेरडा फ्रँक कोण करतं का?'

'पूनम पांडे तू वेडी आहेस असं कोण करतं? मी तुला कॉल केला तू एकही कॉल उचलला नाहीस.', या व्हिडीओच्या माध्यमातून राखीने पूनम पांडेला अनेक सवाल करत तिच्यावर राग व्यक्त केला आहे. पूनम जिवंत असल्याचे कळताच राखी थोडी रिलॅक्स झाली खरी. पण तिने व्हिडीओच्या शेवटी अशे म्हटले आहे की, 'तू जिवंत राहा, आनंदी राहा, असे घाणेरडे खेळ पुन्हा खेळू नको, मीडिया किंवा लोकांशी कधीही खेळू नको. आम्ही किती काळजीत होता हे सगळ्यांना माहीत आहे, सगळ्यांना वाटलं की तू 32 वर्षांत निघून गेली.'

पूनम पांडेच्या मृत्यूनंतर सर्वांना मोठा धक्का बसला होता. सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केले होते. पण रविवारी पूनमने एक व्हिडीओ पोस्ट करत आपण जीवंत असल्याचे सांगितले होते. तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर करत सांगितले की, 'तुमच्या सर्वांसोबत काहीतरी महत्त्वाचे शेअर करायला मी समोर आली आहे. मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने माझा मृत्यू झाला नाही, परंतु दुर्दैवाने, या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल ज्ञानाच्या अभावामुळे हजारो महिलांचे प्राण गेले आहेत. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मी इथे तुमच्या समोर या आजाराविषयी थोडक्यात माहिती द्यायला आली आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : LPG गॅस टॅंकरला अपघात, ९ तासांपासून वाहतूक ठप्प | VIDEO

HBD Sanjay Dutt : संजय दत्तच्या नावावर चाहतीने केली होती तब्बल ७२ कोटींची संपत्ती, पैशांचं अभिनेत्याने काय केलं?

Marathi Hindi Language Controversy : "मराठी बोलना जरुरी हैं क्या ?" म्हणणाऱ्या खारघरमधील परप्रांतीय तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी धडा शिकवला

Gold Rates: खरेदीला लागा! सोन्याच्या दरात घसरण, १० तोळं सोनं १,१०० रूपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

SCROLL FOR NEXT