PM Modi On The Vaccine War Saam Tv
मनोरंजन बातम्या

PM Modi On The Vaccine War: 'चित्रपट पाहून अभिमान वाटतो', PM मोदींनी ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या निर्मात्यांचं केलं कौतुक

The Vaccine War Movie: राजस्थानमध्ये जनतेशी संवाद साधताना पीएम मोदींनी 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाचे आणि निर्मात्यांचे कौतुक केले आहे.

Priya More

The Vaccine War:

'काश्मिर फाईल्स'च्या (Kashmir Files) यशानंतर विवेक अग्निहोत्री 'द व्हॅक्सिन वॉर' (the vaccine war) हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. नुकताच 'द व्हॅक्सीन वॉर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. कोरोना काळामध्ये आपल्या देशामध्ये व्हॅक्सीन तयार करण्यात आले होते. यासाठी वैज्ञानिकांनी घेतलेली मेहनत या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. अशामध्ये देशाचे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी 'द वॅक्सीन वॉर' या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज राजस्थानच्या जोधपूरमध्ये सभा झाली. या सभेवेळी राजस्थानमधील जनतेशी संवाद साधताना पीएम मोदींनी 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाचे आणि निर्मात्यांचे कौतुक केले आहे. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, 'मी ऐकले आहे की एक चित्रपट आला आहे. ‘द व्हॅक्सिन वॉर’. भारतात कोविडशी लढण्यासाठी आपल्या देशातील वैज्ञानिकांनी रात्रं-दिवस मेहनत घेतली. प्रयोगशाळेत ऋषीसारखं ध्यान केले. महिला वैज्ञानिकांनी देखील अद्भूत काम केलं. या सर्व गोष्टींना अतिशय छान पद्धतीने या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.'

'भारतीयांना 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपट पाहून अभिमान वाटत आहे कारण आपल्या वैज्ञानिकांनी हे ऐवढं मोठं काम केलं आहे. आपल्या देशातून चांद्रयान जाते, व्हॅक्सीन तयार होते तेव्हा वैज्ञानिकांसह सर्वांना अभिमान वाटतो. हा चित्रपट तयार करून शास्त्रज्ञ आणि विज्ञानाला महत्त्व दिल्याबद्दल मी या चित्रपटाच्या निर्मात्यांचे अभिनंदन करतो.', असे देखील मोदींनी यावेळी सांगितले.

'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट कोरोनावरील लसीच्या निर्मितीमागे भारतीय वैज्ञानिकांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या संघर्षावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये कोरोना व्हॅक्सिन तयार करताना घडलेल्या सर्व घडामोडी दाखवतो. नाना पाटेकर, पल्लवी जोशी यांच्यासह अनेक स्टार्स या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT