Parineeti Chopra Dupatta Photo Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra Dupatta Photo: परिणीतीच्या लेहेंग्यावरील ओढणीवर लिहिला होता 'हा' खास शब्द, तुम्ही पाहिला का?

Parineeti-Raghav Wedding Photo: नुकताच या कपलने इन्स्टाग्रामवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. लग्नामध्ये केलेल्या त्यांच्या लूकची खूपच चर्चा होत आहे.

Priya More

Parineeti Chopra And Raghav Chadha:

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांचा 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या 'द लीला पॅलेस'मध्ये मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत या कपलने सात फेरे घेऊन एकमेकांना आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडले. परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा लग्नातील लूक पाहण्यासाठी त्यांचे चाहते कालपासून आतुरतेने वाट पाहत होतो आणि अखेर त्यांची ही प्रतीक्षा संपली. नुकताच या कपलने इन्स्टाग्रामवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. लग्नामध्ये केलेल्या त्यांच्या लूकची खूपच चर्चा होत आहे. विशेष म्हणजे परिणीतीने डोक्यावर घेतलेल्या ओढणीने सर्वांचे लक्ष वेधले.

परिणीती चोप्राने लग्नामध्ये पेस्टल कलचा लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये परिणीती नववधूच्या रुपात खूपच सुंदर दिसत होती. परिणीतीने यावेळी लेहेंग्यासोबत कॅरी केलेल्या ओढणीने साऱ्याचे लक्ष वेधून घेतले. कारण या ओढणीवर तीन अक्षरांचा खास शब्द लिहिण्यात आला होता. परिणीतीच्या या ओढणीवर तिच्या नवऱ्याचे म्हणजेच राघवचे सुंदर अक्षरामध्ये नाव कोरण्यात आले होते.

परिणीतीने लग्नामध्ये पेस्टल रंगाच्या लेहेंग्यासोबत न्यूड मेकअप केला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. गळ्यामध्ये हेवी ज्वेलरी तिने घातली होती. परिणीतीने डोक्यावर लांबलचक ओढणी घेतली होती. या ओढणीला सोनेरी रंगाची काठ होती तसंच त्याला पांढऱ्या मोतीने डिझाइन केले होते. या ओढणीच्या मध्यभागी राघवचे नाव सोनेरी रंगामध्ये कोरण्यात आले होते. परिणीतीने लग्नातील जे फोटो शेअर केले आहे त्यामध्ये तिचा एक पाठमोरा फोटो आहे. ज्यामध्ये परिणीतीच्या ओढणीवर राघवचे नाव स्पष्टपणे दिसत आहे.

मनीष मल्होत्राने परिणीती चोप्राच्या लग्नाचा संपूर्ण लुक डिझाइन केला होता. तिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तो उदयपूरलाही पोहोचला होता. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या लग्नाला सानिया मिर्झा, मधु चोप्रा, हरभजन सिंग, सीएम अरविंद केजरीवाल, पंजाबचे सीएम भगवंत मान यांच्यासह अनेक स्टार्स आणि बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. प्रियांका चोप्रा तिच्या कमिटमेंट्समुळे बहीण परिणीतीच्या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही. पण परिणीतीने शेअर केलेल्या फोटोंवर प्रियंकाने कमेंट करत तिला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दारूचे पैसे न दिल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण; घटना CCTVत कैद

Bus Accident : भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस १५ फूट खोल नदीत कोसळली, दोन जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

Stamp Duty Government Decision: फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सर्वप्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे ₹500 चे मुद्रांक शुल्क माफ

Manoj Jarange: विठ्ठला... सरकारला सद्बुद्धी दे, मराठा आरक्षण लवकर मिळू दे, जरांगे पाटलांचे साकडे|VIDEO

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT