मनोरंजन बातम्या

Main Atal Hoon Release Date: 'सोने का दिल, लोहे का शरीर', पंकज त्रिपाठीचा ‘मैं अटल हूं’ या दिवशी येणार भेटीला

Main Atal Hoon New Poster: या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

Priya More

Main Atal Hoon Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता पंकज त्रिपाठीच्या ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाची (Main Atal Hoon Movie) काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली होती. आज या चित्रपटाचे चार वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे. आज या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे.

नुकताच ‘मैं अटल हूं’ या चित्रपटाचे जे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. यामध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते पंकज त्रिपाठी हा हुबेहुब अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा दिसत आहे. हे पोस्टर रिलीज करत चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट येत्या १९ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पंकज त्रिपाठीने इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट करत हे पोस्टर शेअर केले आहेत. त्याने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'सोन्यासारखे मन, लोहासारखे शरीर' एक उत्कृष्ट कवी. नवीन भारताचे भविष्यदर्शी. अटलबिहारी वाजपेयी यांची कहाणी पाहा. ‘मैं अटल हूं’ १९ जानेवारीला चित्रपटगृहात येत आहे.' पंकज त्रिपाठीच्या या पोस्टला दोन लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनाविषयीच्या बायोपिकच्या घोषणेने प्रेक्षकांमध्ये मोठी अपेक्षा निर्माण केली होती.आता पंकज त्रिपाठीचे श्री अटलजींमध्ये रूपांतरित झालेल्या पहिल्या लूकने प्रचंड चर्चा निर्माण केली आहे. त्याच्या या लूकची प्रचंड प्रशंसा होत आहे. पंकज त्रिपाठीचा लूक पाहून आता प्रेक्षकांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक वाढली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. तर ऋषी विरमणी आणि रवी जाधव यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. विनोद भानुशाली, संदीप सिंग आणि कमलेश भानुशाली यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विदर्भात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या

Petrol diesel Rate today: US-इराण युद्धाच्या भडक्याचा थेट खिशावर परिणाम? कच्च्या तेलाचे भाव कडाडले; तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर पाहा

8th Pay Commission : बेसिक सॅलरी १८ हजारांवरून थेट ७२ हजार होणार? प्रस्ताव नेमका कुणाचा,जाणून घ्या संपूर्ण माहिती

सिल्की आणि शायनी केसांसाठी महागडे शॅम्पू नाही, केस धुण्याची 'जपानी स्टाईल' पद्धत फॉलो करा

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 14200 रुपयांनी स्वस्त; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT