Vicky Kaushal And Tripti Dimri Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tripti Dimri: रणबीर कपूरनंतर तृप्ती डिमरी विकी कौशलसोबत करणार रोमान्स, रोमँटिक फोटो व्हायरल

Mere Mehboob Mere Sanam Movie: समोर आलेल्या नव्या अपडेटनुसार, तृप्ती डिमरी बॉलिवूड स्टार विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) रोमान्स करताना दिसणार आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Vicky Kaushal And Tripti Dimri Photos:

नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'अ‍ॅनिमल' (Animal Movie) चित्रपटामध्ये काम केलेली बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) सध्या चर्चेत आली आहे. रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) या चित्रपटामध्ये काम करून रातोरात तृप्ती डिमरीचे नशीब पालटले. सध्या नेटिझन्सनी तर तृप्तीला भारताची नवीन क्रश म्हणून टॅग दिला आहे. या चित्रपटातील तृप्ती डिमरीच्या अभिनयाच्या प्रेमात सर्वजण पडले आहेत. अशामध्ये आता समोर आलेल्या नव्या अपडेटनुसार, तृप्ती डिमरी बॉलिवूड स्टार विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) रोमान्स करताना दिसणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूरसोबत रोमान्स केल्यानंतर ती आता विकी कौशलसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. तृप्ती डिमरी 'मेरे मेहबूब मेरे सनम' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक आहेत. अशामध्ये या चित्रपटाच्या सेटवरून विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये दोघेही रोमान्स करताना दिसत आहेत. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये विकी कौशल आणि तृप्ती डिमरी यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. 'मेरे मेहबूब मेरे सनम' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे फोटो लीक झाले आहेत. या फोटोंमध्ये तृप्ती डिमरी आणि विकी कौशल क्रोएशियामध्ये शूटिंग करताना दिसत आहेत. दोघांच्या या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. विशेष म्हणजे ते आता या चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

'अ‍ॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरसोबत बोल्ड सीन्स दिल्यानंतर तृप्ती डिमरीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. इन्स्टाग्रामवर दिवसेंदिवस तिचे फॉलोअर्स वाढत आहेत. आतापर्यंत ३.७ दशलक्ष लोकांनी तिला फॉलो केले आहे. सध्या तृप्ती डिमरी देखील सोशल मीडियावर सक्रीय असून नवनव्या फोटोशूटच्या माध्यमातून ती चाहत्यांना वेड लावण्याची एकही संधी सोडत नाहीये. तृप्ती डिमरीच्या प्रत्येक पोस्टवर लाखो लोकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तृप्ती डिमरीने आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली. पण 'अ‍ॅनिमल'मुळे ती प्रकाशझोतामध्ये आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT