Laapataa Ladies Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Laapataa Ladies Twitter Review: किरण रावच्या 'लापता लेडीज'वर प्रेक्षक फिदा, सोशल मीडिया पोस्टद्वारे केलं कौतुक

Laapataa Ladies Movie: किरण राव दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाचे कौतुक करत आहे.

Priya More

Kiran Rao Film Laapataa Ladies:

बॉलिवूडचा (Bollywood) 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानच्या (Aaamir Khan) प्रोडक्शन हाऊसचा 'लपता लेडीज' हा चित्रपट अखेर आज म्हणजेच १ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. किरण रावच्या (Kiran Rao) दमदार कथेला कॉमेडीचा टच घालून हा चित्रपट प्रेक्षकांसमोर मांडला आहे. 'लापता लेडीज' ही दोन नवविवाहित वधूंची कहाणी आहे. ज्या अचानक बेपत्ता होतात. या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांनी पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

किरण राव दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये मोठी गर्दी करत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रपटाचे कौतुक करत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत... मॉर्निंग शो पाहणाऱ्या लोकांचे काय म्हणणे आहे ते येथे जाणून घेऊया...

मिसिंग लेडीजची खरी हिरो किरण राव आहे. तिने या चित्रपटाची कथा ऑनस्क्रीन अतिशय सुंदरपणे मांडली आहे. 'लापता लेडीज' चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक सोशल मीडियावर पोस्ट करत कौतुक करत आहे. एका युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कमेंट करत लिहिले की, 'लापता लेडीज ही दोन वधूंची कथा आहे. किरण राव यांनी भारताच्या हृदयातील महिलांची ओळख आणि सशक्तीकरण विनोदी शैलीत मांडले आहे...' तर दुसऱ्या युजरने लिहिले की, 'क्वालिटी...क्वालिटी आणि क्वालिटी. प्रॉडक्शन हाऊसला खूप जास्त शक्ती. गॉडस्पीड !!!'

मिसिंग लेडीजमध्ये एकही मोठा नायक किंवा नायिका कास्ट केलेली नाही. 2 तासांचा हा चित्रपट पहिल्या 15 मिनिटांतच महत्वाचा मुद्दा गाठतो आणि नंतर कथा पुढे सरकते. किरण राव यांनी हा चित्रपट अतिशय सुंदरपणे मांडला आहे. एका युजरने सोशल मीडियावर किरण रावच्या लपता लेडीज या चित्रपटाचे दीर्घ पुनरावलोकन शेअर केले आहे. या युजरने लापता लेडीज चित्रपटाच्या कथेचे वर्णन पुरस्कार विजेते म्हणून केले आहे. तसेच, त्याने किरण रावचे कौतुकही केले आहे.

'मिसिंग लेडीज' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. सोशल मीडियावरही या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत या चित्रपटाचे पुनरावलोकन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, '#OneWordReview… #LaapataaLadies: TERRIFIC.' यासोबतच त्यांनी या चित्रपटासाठी एक लांबलचक नोटही लिहिली आहे. तरण आदर्श यांनी किरण रावच्या या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाला त्यांनी ४ स्टार दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT