How Ranveer Propose Deepika?  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ranveer - Deepika: रणवीरने दीपिकाला प्रपोज करून केलं होतं सरप्राईज; ठिकाणही होतं भलतच रोमॅन्टिक

Koffee With Karan 8: रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने 'कॉफी विथ करण'च्या ८ व्या सीजनला हजेरी लावली होती.

Pooja Dange

Ranveer Singh - Deepika Padukone At Koffee With Karan 8:

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. या कपलने 'कॉफी विथ करण'च्या ८ व्या सीजनला हजेरी लावली होती.

'कॉफी विथ करण सीजन ८'मध्ये आलेल्या या कपलने त्याच्या आयुष्यातील अनेक गुपित उघड केली आहेत. 'कॉफी विथ करण'मध्ये रणवीर सिंगने दीपिका पदुकोणला कास प्रपोज केलं हे सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी 'कॉफी विथ करण सीजन ८' च्या प्रोमोचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रणवीरने दीपिकाशी लग्नाच्या ३ वर्षांआधीच एंगेज झाल्याचे सांगितले होते.

'कॉफी विथ करण' रणवीरने त्याच्या आयुष्यातील रोमँटिक गोष्टी शेअर केल्या आहेत. रणवीरने करण जोहरच्या चॅट शोमध्ये सांगितले की त्याने दीपिकाला लग्नच्या ३ वर्षे आधी प्रपोज केलं होतं.

'राम-लीला चित्रपट झाल्यानंतर आम्ही एकमेकांना डेट करत होतो. एक वेळ अशी आली जेव्हा मी वाटलं ही माझीच आहे मी विचार केला, अजून काही होण्याआधी आमचा नात्याच्यावर शिकामोर्तब करून घेतो.

मी माझ्या आई आणि बहिणीसोबत जाऊन अंगठी विकत घेतली. मी आणि दीपिका हॉलिडेसाठी जाणार होतो. मी विचार केला तिला तिथेच प्रपोज कारेन. तिला घेतलेली अंगठी देखील मी सोबत घेतली होती.

माझ्या पालकांनी मला विचारलं, तू तिला प्रपोज करणार आहेस? तिच्या आई-वडिलांची परवानगी नाही घेणार का? माझ्याकडे तेवढी मॅच्युरिटी नव्हती. मी विचार केला, 'मला तिच्याशी लग्न करायचं आहे. तर तिलाच विचारतो.'

आम्ही मालदीवला गेलो होतो. मी माझ्यासोबत लपवून अंगठी देखील नेली होती. मला संधी मिळाली जेव्हा आम्ही समुद्राच्या मधोमध होतो. समुद्राच्या मधोमध एक आयलंड होते. त्या आयलंडवर फक्त आम्ही दोघेच होतो. ही योग्य संधी आहे असे मला वाटलं. दीपिकाने वाटलं देखील नसेल की मी तिला प्रपोज करेन. (Latest Entertainment News)

दीपिका खूप इमोशनल झाली. तिने मला होकार दिला. मला मी राजा असल्यासारखं वाटू लागलं. आणि असे आम्ही एंगेज झालो.' रणवीर सिंगने दीपिका कसे प्रपोज केले ते सांगितले.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगने नोव्हेंबर २०१८ साली इटली येथे लग्न केले. या दोघांच्या लग्नातील अनसीन फोटो 'कॉफी विथ करण' या शोमध्ये दाखविण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचं मंत्री संजय सावकारे यांचा कार्यालयाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

SCROLL FOR NEXT