Deepika Padukone Practice Viparita Karani Asana Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone Fitness : प्रेग्नन्सीमध्येही दीपिका पादुकोण सुपरफिट, दररोज न चुकता करते 'विपरित करणी आसन'; Photo पाहाच

Deepika Padukone Practice Viparita Karani Asana : अभिनेत्री दीपिका पादुकोण येत्या सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. सध्या दीपिका प्रग्नेंसीच्या काळात स्वत:ची विशेष काळजी घेताना दिसत आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री दीपिका पादुकोण येत्या सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. सध्या दीपिका प्रग्नेंसीच्या काळात स्वत:ची विशेष काळजी घेताना दिसत आहे. नुकतंच दीपिकाने इन्स्टाग्रामवर योगासन करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोत असं दिसतंय की, अभिनेत्री स्वत: ची प्रेग्नेंसीच्या दिवसांत विशेष काळजी घेताना दिसत आहे.

दीपिकाने इन्स्टाग्रामवर योगसाधना करतानाचा एक फोटो पोस्ट केला. ‘मी चांगलं दिसण्यासाठी नाही तर फिट राहण्यासाठी वर्कआऊट करते’, असं तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय. दीपिकाच्या या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंहनेसुद्धा तिच्या फोटोवर खास कमेंट केली आहे. योगसाधनेचा फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने त्या योगाचं महत्त्व आणि त्याविषयी सविस्तर माहिती तिने दिली आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री "विपरित करणी आसन" करताना दिसतेय.

शेअर केलेल्या पोस्टमध्ये दीपिका पादुकोण म्हणते, "हा ‘सेल्फ केअर महिना’ आहे. पण जेव्हा तुम्ही दररोज स्वत:ची काळजी घेण्यासारखे छोट्या छोट्या गोष्टी पाळू शकता तेव्हा 'सेल्फ-केअर मंथ' का साजरा करत आहेत? मला दररोज वर्कआऊट करायला आवडतो. मी नेहमीच वर्कआऊट चांगलं दिसण्यासाठी नाही तर फिट राहण्यासाठी करते. व्यायाम हा माझ्या डेली रुटिनमधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे."

"पण जेव्हा मी वर्कआऊट करू शकत नाही, तेव्हा पाच मिनिटे का होईना साधा रुटीन फॉलो करते. जरीही मी वर्कआऊट नाही केलं तरी मी दररोज आसन मात्र करते. या आसनाचा फायदा मला, विमानातील अनेक तासांचा प्रवास केल्यानंतरचा स्ट्रेबस कमी करायला बराच आराम मिळतो." असं लिहित दीपिकाने नेटकऱ्यांना दररोज व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले. शिवाय अनेकांनी तिच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे.

दीपिका पदुकोणच्या कामाबद्दल सांगायचे तर, दीपिका शेवटची 'फायटर' चित्रपटामध्ये दिसलेली होती. आता लवकरच दीपिका 'कल्की 2898 एडी' या चित्रपटातून टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करणार आहे. त्यासोबतच 'लव्ह 4 एव्हर' आणि 'सिंघम अगेन' या चित्रपटातूनही ती चाहत्यांचे निखळ मनोरंजन करणार आहे. सध्या दीपिका 'कल्की 2898 एडी' चित्रपटामुळे चर्चेक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

SCROLL FOR NEXT