Aryan Arora Hospitalized Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aryan Arora: बॉलिवूड अभिनेत्यावर केअर टेकरने केला जीवघेणा हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू; काय आहे प्रकरण?

Priya More

Attack On Actor Aryan Arora:

बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत काम करणाऱ्या अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्यन अरोरा असं या अभिनेत्याचे नाव असून त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कार पार्किंगवरून झालेल्या वादानंतर केअर टेकरने आर्यनवर स्टंपने हल्ला केला. या हल्ल्यात आर्यान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन अरोरा आपल्या मित्रांसोबत दिल्लीजवळील क्रिकेट अकादमीमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. क्रिकेट अकादमीतून कार काढण्यावरून आर्यनचा केअरटेकरसोबत वाद झाला होता. त्यानंतर केअर टेकरने त्याच्या डोक्यावर स्टंपने वार केले. त्यामुळे अभिनेत्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. आर्यनवर कमला नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेता आर्यन अरोरा हा दयालबाग ताजनगरचा रहिवासी आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारस घडली. आर्यनचे वडील मधुकर अरोरा हे समाजवादी पार्टीचे नेता आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन त्याच्या मित्रांसोबत खासपुरा सिकंदरपूर गावात असलेल्या ढिल्लॉन क्रिकेट अकादमीमध्ये खेळायला गेला होता. याठिकाणी आर्यनचा अकादमीचे केअरटेकर श्रीकृष्णा यांच्याशी कार काढण्यावरून वाद झाला. हा वाद ऐवढा वाढला की केअरटेकरने आर्यनच्या डोक्यात स्टंपने वार केले. त्यामुळे आर्यन जागीच बेशुद्ध पडला. या घटनेनंतर केअर टेकर फरार झाला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या आर्यनच्या मित्रांनी त्याला तात्काळ कमलानगर येथील रश्मी मेडिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांनी आर्यनच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. आर्यनवर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. त्याच्या डोक्याला 12 टाके पडले आहेत. त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. न्यू आग्रा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजीव सिंह यांनी सांगितले की, आर्यनच्या कुटुंबीयांच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात कलम 307, 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके तैनात करण्यात आली आहेत.

आर्यन अरोरा त्याच्या आईसोबत मुंबईमध्ये राहतो. मुंबईतच तो शिक्षण घेत आहे. सुट्टी असल्यामुळे तो आग्रा येथील आपल्या घरी आला होता. त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने सलमान खान, सिद्धार्थ मल्होत्रा, परिणीती चोप्रासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केले आहे. 'जबरिया जोडी' या चित्रपटातून त्याने फिल्मी करिअरची सुरुवात केली. आर्यनने 'राधे', 'गुंजन सक्सेना' यासारख्या अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने अनेक वेबसीरिज आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jitada Fish : चविष्ट 'जिताडा' समुद्रातून होतोय गायब, मच्छिमारांच्या हातीही लागेना; काय आहे कारण? पाहा व्हिडिओ

Maharashtra News Live Updates : वडीगोद्रीत मराठा आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने, घटनास्थळी पोलीस तैनात

Maharastra Politics : साखरपट्टा महायुतीला कडू? शरद पवारांच्या डावाने सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढलं? वाचा सविस्तर

Maharashtra Politics: मविआची 80 टक्के जागावाटपावर चर्चा पूर्ण, विदर्भात तिढा कायम; VIDEO

Mumbai Senate Election : मोठी बातमी! मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित, कारण काय? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT