Suhani Bhatnagar Father Saam
मनोरंजन बातम्या

Suhani Bhatnagar: या आजाराने घेतला 'दंगल गर्ल'सुहानी भटनागरचा जीव, वडिलांनी सांगितलं त्या दिवशी नेमकं काय घडलं?

How Suhani Bhatnagar Died: सुहानी भटनागरच्या अचानक मृत्यूमुळे तिच्या आई-वडिलांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आई-वडिलांची अवस्था खूपच वाईट आहे. त्यांची मुलगी इतक्या लहान वयात जग सोडून गेली यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये.

Priya More

Suhani Bhatnagar Dies:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता आमिर खानचा (Aamir khan) 'दंगल' चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचे खूप कौतुक करण्यात आले. या चित्रपटामध्ये छोटी बबिताची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री सुहानी भटनागरच्या (Suhani Bhatnagar) अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले. सुहानी भटनागर सध्या आपल्यासोबत नाही. १९ वर्षांच्या सुहानी भटनागरचे शनिवारी निधन झाले. तिच्या निधनामुळे चाहत्यांसह संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला.

सुहानी भटनागरच्या अचानक मृत्यूमुळे तिच्या आई-वडिलांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आई-वडिलांची अवस्था खूपच वाईट आहे. त्यांची मुलगी इतक्या लहान वयात जग सोडून गेली यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये. १९ वर्षांच्या सुहानीला डरमेटोमायसाइटिस नावाचा आजार झाला होता. या आजारानेच तिचा जीव घेतला. सुहानीसोबत नेमकं काय घडलं होतं?, तिचा मृत्यू नेमका कसा झाला? असे अनेक प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत. अशामध्ये सुहानी भटनागरच्या आई-वडिलांनी मीडियाशी बोलताना त्यांच्या मुलीच्या मृत्यूबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

सुहानी भटनागरच्या वडिलांनी सांगितले की, 'दोन महिन्यांपूर्वी त्यांच्या मुलीच्या एका हाताला सूज आली होती. ज्याकडे आम्ही फारसे गांभीर्याने पाहिले नाही. हळूहळू तिच्या दुसऱ्या हाताला आणि नंतर संपूर्ण शरीरात सूज वाढली. त्यानंतर आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला मात्र हा आजार त्यांच्या नियंत्रणाबाहेर होता. 11 दिवसांपूर्वी म्हणजेच मागच्या मंगळवारी सुहानीला एम्समध्ये दाखल करण्यात आले. तिथे तिच्या टेस्ट करण्यात आल्या आणि तिला डर्माटोमायोसिटिस नावाचा आजार असल्याचे समोर आलं. हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे. या आजारावर स्टेरॉईड्स हा एकमेव उपचार आहे.'

उपचारादरम्यान डॉक्टरांनी सुहानीला स्टिरॉइड्स दिले आणि त्यामुळे तिच्या शरीराची स्वयंप्रतिकार शक्ती प्रभावित झाली आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली. डॉक्टरांनी सांगितले की, या आजारातून बरे होण्यासाठी बराच वेळ लागतो. परंतु कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे सुहानीला संसर्ग झाला. सुहानीची फुफ्फुसे कमकुवत झाली आणि पाण्याने भरली.तिला श्वास घेणं देखील कठीण झाले. उपचारादरम्यानच सुहानीने काल जगाचा निरोप घेतला.'

सुहानी भटनागरची आई म्हणाली, 'तिला तिच्या मुलीचा अभिमान आहे. ती लहानपणापासून मॉडेलिंग करायची. दंगल चित्रपटासाठी 25 हजार मुलींमधून तिची निवड झाली होती. ती लहानपणापासून कॅमेरा फ्रेंडली होती. ती सध्या जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला चित्रपटात काम करायचे होते. आमिर खानपासून ते 'दंगल' चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारीपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी सुहानी भटनागरच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT