Swini Khara Wedding Saam Tv
मनोरंजन बातम्या

Swini Khara Wedding: 'चीनी कम' फेम अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, स्विनी खराच्या लग्नातील फोटो व्हायरल

Swini Khara Married With Boyfriend Urvish Desai: या वर्षात लग्न केलेल्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये आता 'चीनी कम' चित्रपटामध्ये बालकलाकाराच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री स्विनी खरा नुकताच विवाहबंधनात अडकली.

Priya More

Swini Khara Wedding Photos:

2023 हे वर्ष बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसाठी खूपच खास ठरले आहे. या वर्षामध्ये अनेक सेलिब्रिटींचे चित्रपट सुपरहिट ठरले, काहींच्या करिअरला नवी कलाटणी मिळाली, काहींनी तर लग्न करत नव्या आयुष्याची सुरूवात केली. या वर्षात कियारा अडवाणीपासून ते मालविका राजपर्यंत अनेक अभिनेत्रींनी धुमधडाक्यामध्ये लग्न केले. या वर्षात लग्न केलेल्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये आता 'चीनी कम' चित्रपटामध्ये बालकलाकाराच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री स्विनी खरा नुकताच विवाहबंधनात अडकली.

बॉलिवूडची अभिनेत्री स्विनी खराने तिचा बॉयफ्रेंड उर्विश देसाईसोबत लग्न केले. स्विनीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 26 डिसेंबरला राजस्थानमधील जयपूरमध्ये धुमधडाक्यात स्विनीने बॉयफ्रेंड उर्विश देसाईसोबत ग्रँड वेडिंग केले. स्विनी आणि उर्विश लग्नामध्ये खूपच आनंदी आणि क्युट दिसत होते.

लग्नामध्ये स्विनीने गुलाबी रंगाचा हेवी एम्ब्रॉयडरी लेहेंगा परिधान केला होता. गुलाबी लेहेंग्यासह अभिनेत्रीने गळ्यामध्ये चांदीचा कुंदन हार, त्याला शोभेल असे हेवी कानातले, मांग टिक्का, हातात गुलाबी बांगड्या घालून आपला ब्रायडल लूक परिपूर्ण केला होता. नववधूच्या रुपामध्ये स्विनी खरा खूपच सुंदर दिसत होती. तर तिचा नवरा उर्विश देसाईने ऑफ व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. यामध्ये तो खूपच हँडसम दिसत होता.

स्विनी बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. स्विनीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चीनी कम' चित्रपटात स्विनीने सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. तिच्या अभिनयाचे खूपच कौतुक करण्यात आले होते. त्याचबरोबर स्विनीने 'बा बहू और बेबी'मध्येही काम केले होते. स्विनी खारा 2016 मध्ये आलेल्या 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातही दिसली होती. या चित्रपटात तिने जयंतीची भूमिका साकारली होती.

स्विनी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर होती. आता स्विनी खूपच वेगळी दिसते. स्विनीने याच वर्षी इन्स्टाग्रामवर तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली होती. आता स्विनीने लग्न केल्यामुळे तिचे चाहते खूपच आनंदी झाले आहेत. स्विनीच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर कमेंट्स करत तिचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jolly LLB 3 : अक्षय आणि अर्शदला पुणे न्यायालयाचा दणका, 'जॉली एलएलबी ३' वादाच्या भोवऱ्यात

Tulsi Kadha Recipe : पावसात भिजल्यामुळे घसा खवखवतोय? पटकन प्या ग्लासभर तुळशीचा काढा

Maharashtra Rain Live News : उल्हास नदीवरील पूल पाण्याखाली; महामार्ग वाहतुकीस बंद

Beed Crime News : "आम्ही सुरेश धसांची माणसं ... ", १२ हजारांच्या वादातून तरुणाचं अपहरण करून मारहाण

Rain Grant Scam : अतिवृष्टी अनुदान घोटाळा; अखेर २८ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल, २५ कोटींचा अपहार केल्याचा ठपका

SCROLL FOR NEXT