Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding Gifts Saam Tv
मनोरंजन बातम्या

Anant-Radhika Pre-Wedding मध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिले महागडे गिफ्ट, Shah Rukh Khanच्या गिफ्टची किंमत ऐकून व्हाल चकीत

Anant-Radhika Pre-Wedding Gifts By Bollywood Celebrities: बॉलिवूड सेलिब्रिटींनी खूपच महागडे गिफ्ट्स दिले आहेत. सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) अनंत अंबानींना त्यांच्या प्री-वेडिंग बॅशमध्ये सर्वात महागडे गिफ्ट दिले होते. कोण-कोणत्या सेलिब्रिटींनी नेमकं काय गिफ्ट दिले ते आपण पाहणार आहोत...

Priya More

Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding :

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग (Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding) पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावत चार चाँद लावले. या फंक्शनमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींनी खूप धम्माल केली. त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या सेलिब्रिटींनी अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगला सर्वात महागडे गिफ्ट्स दिले. बॉलिवूड लाइफने दिलेल्या वृत्तानुसार, बॉलिवूड सेलिब्रिटींनी खूपच महागडे गिफ्ट्स दिले आहेत. सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) अनंत अंबानींना त्यांच्या प्री-वेडिंग बॅशमध्ये सर्वात महागडे गिफ्ट दिले होते. कोण-कोणत्या सेलिब्रिटींनी नेमकं काय गिफ्ट दिले ते आपण पाहणार आहोत...

सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा आडवाणी

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी ही अनंत अंबानी यांची बहीण ईशाची बालपणीची मैत्रीण आहे. दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. अशामध्ये कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने अनंत अंबानीच्या प्री-वेडिंग पार्टीला गोल्ड आणि डायमंडच्या गणेश लक्ष्मीची मूर्ती भेट दिली आहे.

शाहरुख खान -

सुपरस्टार शाहरुख खानने अनंत अंबानींना सर्वात महागडे गिफ्ट दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किंग खानने अनंग अंबानीला एक लक्झरी स्पोर्ट्स कार गिफ्ट केली आहे. ज्याची किंमत ५ कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे.

सलमान खान -

सुपरस्टार सलमान खानने अनंत अंबानी यांना पटेक फिलिप ब्रांडचे कस्टमाइज्ड लक्झरी वॉच भेट दिले आहे. तर राधिका मर्चंटला हिऱ्याची झुमके भेट दिले आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट -

सुपरस्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनीही अनंत-राधिकाला खूप महागडे गिफ्ट दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टने राधिका मर्चंटला गुच्ची ब्रँडची महागडी हिरे जडीत पर्स भेट दिली. रणबीर कपूरने अनंत अंबानींना जॉर्डनचा सर्वात महागडा शू सेट गिफ्ट दिला.

विकी कौशल- कतरिना कैफ -

सुपरस्टार विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनीही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना एक महागडी भेट दिले आहे. या स्टार जोडप्याने लक्झरी ब्रँडचे ब्रेसलेट आणि डायमंड नेकलेस भेट दिले.

प्रियंका चोप्रा -

बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा ही अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग पार्टीला उपस्थित राहू शकली नाही. पण अभिनेत्रीने अनंत अंबानींना त्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये खूप महागडे लक्झरी ब्रेसलेट भेट दिले. तसेच राधिका मर्चंटला महागडा परफ्यूम भेट दिला.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग -

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांना महागडे गिफ्ट्स दिले आहेत. या कपलने दोघांनाही एका लक्झरी ब्रँडचे डायमंडचे कपल वॉच गिफ्ट दिले आहे.

कार्तिक आर्यन -

सुपरस्टार कार्तिक आर्यननेही अनंत अंबानींना महागडे वॉच गिफ्ट केले आहे. अभिनेत्याने राधिका मर्चंटला डायमंड नेकलेस गिफ्ट केला आहे.

शाहिद कपूर आणि मीरा कपूर -

शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांनी राधिका मर्चंटला महागडा हिऱ्यांचा हार भेट म्हणून दिला आहे. तर अनंत अंबानी यांना एक महाग परफ्यूम भेट देण्यात आला.

अजय देवगण- काजोल -

सुपरस्टार अजय देवगण आणि काजोल यांनी अनंत अंबानी यांना डायमंड वॉच आणि राधिका मर्चंटला एक महागडा परफ्यूमही भेट दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

Maharashtra Politics : ‘म’ म्हणजे मराठी नव्हे, तर ‘म’ म्हणजे महापालिका! चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT