Parineeti Chopra Dance Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra Dance Video: पंजाबी गाण्यावर बेभान नाचली परिणीती चोप्रा, एकटक बघत राहिला राघव चड्ढा; VIDEO होतोय व्हायरल

Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding: परिणीती आणि राघव यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये परिणीती पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

Priya More

Parineeti- Raghav Wedding:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाला अवघे दोन दिवस बाकी आहे. लग्नासाठी परिणीती आणि राघव उदयपूरसाठी रवाना झाले. उदयपूरच्या लीला पॅसेसमध्ये दोघेजण सात फेरे घेणार आहेत. लग्नाबाबत हे कपल खूपच उत्सुक आहेत. परिणीती आणि राघवच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशामध्येच परिणीती आणि राघव यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये परिणीती पंजाबी गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

'इश्कजादे' फेम अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे. लवकरच परिणीती आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढासोबत लग्न करणार आहे. लग्नापूर्वी परिणीती आणि राघवने दिल्लीतील गुरुद्वारामध्ये जाऊन माथा टेकला. त्यांचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता परिणीती आणि राघव डान्स करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परिणीतीच्या चाहत्यांनी या व्हिडीओला चांगली पसंती दिली आहे.

इन्स्टाग्राम पेज I Pop Diaries ने नुकताच परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो इन्स्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये परिणीती चोप्रा 'तेरा यार बोलदा' या पंजाबी गाण्यावर तिच्या अप्रतिम पंजाबी मूव्ह्ज दाखवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा सिल्व्हर कलरच्या चमकदार ड्रेसमध्ये दिसत आहे. परिणीती चोप्रा यावेळी बेभान होऊन नाचली. डान्स करणाऱ्या परिणीतीकडे राघव एकटकच पाहत राहिला.

परिणीती चोप्रासोबत राघव चड्ढाने देखील डान्स केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. परिणीतीला एन्जॉय करताना पाहून राघव चड्ढा खूपच आनंदीत झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, परिणीती आणि राघवच्या दोन दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत होते की, दोघेही गुरूद्वारामध्ये बसले होते. याठिकाणी त्यांनी बाबाजींचे दर्शन घेतले. यावेळी दोघांचे कुटुंबीय देखील याठिकाणी उपस्थित होते. याठिकाणीच परिणीतीच्या हातावर राघवच्या नावाची मेहंदी काढण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT