Rishi Kapoor And Nitu Singh Lovestory: Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rishi Kapoor Birth Anniversary: स्वत:च्याच लग्नात बेशुद्ध पडले होते ऋषी कपूर, नीतू सिंग यांचीही झाली होती अशी अवस्था; अशी होती लव्हस्टोरी

Rishi Kapoor And Nitu Singh Lovestory: ऋषी कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची लव्हस्टोरी आणि त्यांच्या लग्नातील काही खास क्षणांबद्दल जाणून घेणार आहोत...

Priya More

Rishi Kapoor Birthday:

बॉलिवूडचे (Bollywood) दिवंगत अभिनेते ऋषी कपूर (Actor Rishi Kapoor) हे आज आपल्यात नाहीत. पण आपल्या चाहत्यांच्या मनामध्ये ते कायम आहेत. बॉलिवूडच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम करत दमदार अभिनयाच्या जोरावर ऋषी कपूर यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. त्या काळचे बॉलिवूडचे 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखले जाणारे ऋषी कपूर आजही प्रेक्षकांच्या हृद्यामध्ये सदैव जिवंत आहेत.

३० एप्रिल २०२२ ला ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला होता. आज ४ सप्टेंबर असून ऋषी कपूर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची लव्हस्टोरी (rishi kapoor and nitu singh lovestory) आणि त्यांच्या लग्नातील काही खास क्षणांबद्दल जाणून घेणार आहोत..

१९७० मध्ये बॉलिवूडमध्ये एन्ट्री -

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी मुंबईत झाला होता. ते बॉलिवूडचे दिवंगत दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांचे चिरंजीव होते. ऋषी कपूर यांनी देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपटसृष्टीत अभिनयाला सुरुवात केली होती. ऋषी कपूर यांनी १९७० मध्ये 'मेरा नाम जोकर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर १९७३ मध्ये त्यांनी 'बॉबी' चित्रपटातून अभिनेता म्हणून अभिनयाला सुरुवात केली. त्या काळामधील ते बॉलिवूडचे सुपरस्टार होते.

ऋषी कपूर असे पडले होते नीतू सिंग यांच्या प्रेमात -

ऋषी कपूर यांनी बॉलिवूडच्या अनेक सुप्रसिद्ध अभिनेत्रींसोबत काम केले होते. 'जहरीला इन्सान' या चित्रपटामध्ये त्यांनी नीतू सिंग यांच्यासोबत काम केले होते. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांची जवळीक वाढली. एकत्र काम करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. नीतू सिंग यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट खूपच सुपरहिट ठरले होते. रिल लाईफमध्ये काम करता करता ऋषी कपूर यांनी रिअल लाईफमध्येही नीतू सिंग यांना आपली लाईफ पार्टनर म्हणून निवड केली होती. नंतर नीतू सिंग यांनी देखील आपलं करिअर सोडून कपूर घराण्याची सून होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी जानेवारी १९८० मध्ये लग्न केले.

लग्नात अशी झाली होती दोघांची अवस्था -

२२ जानेवारी १९८० ला ऋषी कपूर आणि नीतू सिंह हे विवाह बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांचा विवाह हा बॉलीवूडच्या शाही विवाहांपैकी एक होता. या लग्नाच्या वेळी दोघांची प्रकृती अचानक खराब झाली. ऋषी कपूर आणि नीतू सिंग लग्नामध्ये बेशुद्ध पडले होते. स्वत: नीतू सिंग यांनी एका मुलाखतीमध्ये हा किस्सा सांगितला होता. ऋषी कपूर घोडीवर बसायला जात होते. तेव्हा त्यांच्या लग्नाला आलेल्या पाहुण्यांना पाहून ते इतके घाबरले की त्यांना चक्कर आली आणि बेशुद्ध पडले. तर लग्नातला लेहंगा हाताळताना नीतू सिंग या सुद्धा बेशुद्ध पडल्या होत्या. दोघांनाही नंतर बरं वाटल्यानंतर त्यांचे लग्न पार पडले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नगरपंचायत निवडणुकीत नवे समीकरण; शिंदे-ठाकरे सेना एकत्र येणार? VIDEO

Tejpal Wagh: 'हा' मराठमोळा अभिनेता लढवणार नगरपालिकेची निवडणूक, दिली मोठी हिंट

IRCTC चा मोठा निर्णय! फक्त या प्रवाशांनाच बुक करता येणार तिकीट; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: मला संपून टाकण्याची ऑन एअर धमकी दिली- धनंजय मुंडे

Shocking News : सोशल मीडियावरील मित्राला भेटायला गेली अन् विपरित घडलं, ७ वीच्या मुलीवर दोन दिवस सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT