Rajkumar Hirani Dunki Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dunki Movie: 'डंकी' पाहायला जाण्यापूर्वी ४ पॉइंट्समध्ये जाणून घ्या कसा आहे राजकुमार हिरानींचा चित्रपट

Why To Watch Rajkumar Hirani Dunki Movie: शाहरुख खानचा या वर्षातला हा शेवटचा चित्रपट आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या त्याच्या 'पठान' आणि 'जवान'ला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि या चित्रपटानी चांगली कमाई देखील केली.

Priya More

Shah Rukh Khan Dunki Movie:

बॉलवूड (Bollywood) अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) बहुप्रतीक्षित चित्रपट 'डंकी' आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाबाबत शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे फॅन्स थिएटरबाहेर मोठी गर्दी करत आहेत. सध्या सगळीकडे डंकीचीच चर्चा होत आहे. शाहरुख खानचा या वर्षातला हा शेवटचा चित्रपट आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या त्याच्या 'पठान' आणि 'जवान'ला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि या चित्रपटानी चांगली कमाई देखील केली.

आता डंकीला पहिल्या दिवशी प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता हा चित्रपट देखील सुपरहिट ठरेल असे म्हटले जात आहे. पण डंकी पाहायला जाण्यापूर्वी राजकुमार हिरानी यांचा हा चित्रपट कसा आहे आणि का पाहावा? याबद्दल ४ पाईंट्समधून आपण जाणून घेणार आहोत...

डंकी चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. राजकुमार हिरानी हे ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांनी बॉलिवूडला एकापाठोपाठ ५ सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी २००३ मध्ये 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि या चित्रपटाचा सिक्वेल 'लगे रहो मुन्नाभाई', २००९ मध्ये '३ इडियट्स', 'पीके', 'संजू' यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. एकापाठोपाठ ५ सुपरहिट चित्रपट देणाऱ्या राजकुमार हिरानी यांचा डंकी देखील सुपरहिट ठरू शकतो.

राजकुमार हिरानी यांच्या डंकी चित्रपटामध्ये बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, सतीश शाह आणि दीर्या मिर्झा हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील जबरदस्त कास्टमुळे देखील तुम्ही हा चित्रपट नक्की पाहू शकता.

डंकी चित्रपटातील डायलॉग्ससोबत गाणी देखील खूपच जबरदस्त आहेत. या गाण्यांनी रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचे मन जिंकले. यासोबत या चित्रपटाला आणखी जबरदस्त बनवते ती म्हणजे या चित्रपटाची कथा आणि कॉमेडी. त्यामुळे हा चित्रपट खूपच जबरदस्त आहे. जो तुम्हाला हसायला देखील लावेल. त्यासोबत तुम्हाला इमोशनल देखील करेल.

या चित्रपटामध्ये शाहरुख खान आहे. शाहरुख खान सुपरहिट आणि जबरदस्त चित्रपटांसाठी ओळखला जातो. या वर्षातला शाहरुख खानचा हा तिसरा चित्रपट आहे. त्याचा 'पठान' आणि 'जवान' हे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, 'पठान' आणि 'जवान'प्रमाणेच 'डंकी' देखील चांगली कामागिरी करेल. जर तुम्ही शाहरुख खानचे जबरा फॅन असाल तर तुम्ही हा चित्रपट पाहिलाच पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मंत्रालयात आज दोन महत्त्वपूर्ण बैठका

Pune : पुण्यातील भिडे पूल आजपासून पुन्हा वाहतुकीसाठी बंद | VIDEO

UPI च्या नियमांत ५ दिवसात मोठे बदल; थेट तुम्ही करत असलेल्या ट्रान्झॅक्शनवर परिणाम; वाचा सविस्तर

Asia Cup : संजू सॅमसन, कुलदीपला डच्चू? पहिल्या सामन्यात अशी असेल भारताची प्लेईंग ११

SCROLL FOR NEXT