Shah Rukh Khan And Atlee Kumar Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Atlee Kumar सर्वांसमोर Shah Rukh Khan च्या पडला पाया, 'किंग खान'च्या रिअ‍ॅक्शनने जिंकलं चाहत्यांचे मन; VIDEO व्हायरल

Shah Rukh Khan And Atlee Kumar Video: शाहरुख खान आणि अ‍ॅटली कुमार यांच्यात खूप चांगले संबंध आहेत आणि दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात. हे दोन्ही स्टार्स झी सिने अवॉर्ड्स फंक्शनमध्ये सहभागी झाले होते. या फंक्शनदरम्यान अ‍ॅटली कुमारला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाला.

Priya More

Zee Cine Award 2024:

साऊथचा प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार (Atlee Kumar) सध्या चर्चेत आला आहे. अ‍ॅटली कुमारने बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) 'जवान' चित्रपट तयार केला होता. त्याचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले. त्याचसोबत जगभरामध्ये देखील रेकॉर्डब्रेक कमाई केली. अजूनही या चित्रपटाबाबत शाहरुखच्या चाहत्यांमध्ये क्रेझ कायम पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत अनेक अवॉर्ड आपल्या नावावर केले. आता आणखी एका अवॉर्डने या चित्रपटाचे दिग्दर्शक अ‍ॅटली कुमार आणि शाहरुख खानला सन्मानित करण्यात आले आहे.

अ‍ॅटली कुमार आणि शाहरुख खान यांच्यात खूप चांगले बाँडिंग आहे आणि हे नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. रविवारी झी सिने अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. या अवॉर्ड शोमध्ये बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावत चार चाँद लावले. यावेळी अनेक सेलिब्रिटींनी झी सिने अवॉर्ड मिळाला. यावेळी जवानचे दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारला अवॉर्ड घेण्यासाठी स्टेजवर बोलावण्यात आले. त्यावेळी तो अवॉर्ड स्वीकारण्यासाठी स्टेजवर जाण्यापूर्वी शाहरुख खानच्या पाया पडला. त्यानंतर तो स्टेजवर गेला. अ‍ॅटली कुमार आणि शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

शाहरुख खान आणि अ‍ॅटली कुमार यांच्यात खूप चांगले संबंध आहेत आणि दोघेही एकमेकांचा खूप आदर करतात. हे दोन्ही स्टार्स झी सिने अवॉर्ड्स फंक्शनमध्ये सहभागी झाले होते. या फंक्शनदरम्यान अ‍ॅटली कुमारला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड मिळाला. हा अवॉर्ड घेण्यासाठी त्याला स्टेजवर बोलावण्यात आले. त्यावेळी अ‍ॅटली कुमार आपल्या खुर्चीवरून उठतो आणि शेजारी बसलेल्या शाहरुख खानच्या पायाला स्पर्श करतो. त्यानंतर किंग खानने अ‍ॅटलीला मिठी मारली. शाहरुख खान आणि अ‍ॅटली कुमारचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटिझन्स त्यावर जोरदार कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, 'लव्ह फॉर SRK आणि Atlee.' आणखी एका यूजरने लिहिले आहे की, 'अगदी बरोबर.'

अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर 600 कोटींहून अधिक कमाई केली. तर जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली. शाहरुख खान आणि अ‍ॅटली कुमार यांनी 'जवान' चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. शाहरुख खानचा 'जवान' हा 2023 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माणिकराव कोकाटे यांची अँजिओग्राफी केली जाणार

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

SCROLL FOR NEXT