Arjun Kapoor Crying Video Viral Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arjun Kapoor: आईच्या वाढदिवशी बहिणीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला अर्जुन कपूर, VIDEO पाहून चाहते झाले इमोशनल

Arjun Kapoor Crying Video Viral: अर्जुन कपूरची आई मोना कपूर (Mona Kapoor) यांचा वाढदिवस होता. आईच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.

Priya More

Arjun Kapoor Pays Tribute To Mom Mona Kapoor:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. या माध्यमातून तो आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफशी संबंधित सर्व गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. नुकताच अर्जुन कपूरची आई मोना कपूर (Mona Kapoor) यांचा वाढदिवस होता. आईच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त अर्जुन कपूरने सोशल मीडियावर एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. अर्जुनने आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो छोटी बहीण अंशुलाच्या गळ्यामध्ये पडून ढसाढसा रडताना दिसत आहे. अर्जुनचा हा व्हिडीओ पाहून त्याचे चाहते खूपच इमोशनल झाले आहेत.

अर्जुन कपूर आणि त्याची बहीण अंशुला कपूर यांचे आई मोना सुरी कपूरवर खूप प्रेम होते. दोघेही आपल्या आईच्या आठवणींमध्ये अनेकदा इमोशनल झाल्याचे आपण पाहिले आहे. अर्जुन आणि अंशुलाने त्यांच्या आईच्या 60 व्या जयंतीनिमित्त इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अंशुला तिच्या आईसाठी भाषण करताना दिसत आहे. यानंतर दोन्ही भाऊ-बहीण खूप भावूक होताना दिसत आहेत. दोघेही आईच्या आठवणीमध्ये रडताना दिसत आहेत.

अर्जुन कपूरने आपल्या आईसाठी तिच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अंशुला आणि अर्जुन आपल्या आईच्या आठवणीमध्ये इमोशनल झाले. हा व्हिडिओ शेअर करताना दोघांनी कॅप्शनमध्ये त्यांच्या आईचे शब्द लिहिले आहेत. हे पोस्ट करताना अर्जुन आणि अंशुलाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'जशी की माझी आई नेहमी म्हणायची रब राखा.' हे रब राखा म्हणजेच देव आशीर्वाद देवो.

अर्जुन आणि अंशुलाने आईच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये अंशुला तिच्या आईने सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगताना दिसत आहे. ती आईबद्दल म्हणते की, 'माझी आई नेहमी म्हणायची तुला जे व्हायचंय, तुला जे करायचंय ते कर. त्यांचे आणि माझे बोलणे ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. रब राखा.' या व्हिडीओमध्ये पुढे दिसत आहे की, अशु्ंला स्टेजवरुन खाली येते आणि अर्जुनच्या गळ्यात पडून रडू लागते. दोघेही बहीण-भाऊ यावेळी इमोशनल होऊन रडू लागले. त्यांना असे रडताना पाहून त्याठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण इमोशनल झाले.

अर्जुन आणि अंशुलाच्या या व्हिडीओवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कमेंट्स करत प्रेमाचा वर्षाव केला आहे. बॉबी देओल, आयुष्मान खुराना, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर, पुलकित सम्राट, ताहिरा कश्यप, मुकेश छाबरा यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हार्ट इमोजी शेअर करून त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बोनी कपूर आणि मोनी सूरी यांचे लग्न 1983 मध्ये झाले होते आणि दोघेही 1996 मध्ये वेगळे झाले होते. त्याचवर्षी बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी लग्न केले. बोनी कपूर यांना पहिल्या पत्नीपासून अर्जुन आणि अंशुला ही मुलं आहेत. तर श्रीदेवीपासून जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. श्रीदेवीच्या निधनानंतर अंशुला आणि अर्जुन हे दोघेही जान्हवी आणि खुशी यांच्यासाठी सपोर्ट सिस्टम म्हणून उभे राहिले. 25 मार्च 2012 रोजी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये कर्करोगामुळे मोना सुरी यांचे निधन झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT