Arbaaz Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Arbaaz Khan Wedding Rumors: उद्या कुठं यायचं?, पापाराझींनी लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नावर अरबाज खाननं दिलं असं रिअ‍ॅक्शन; VIDEO व्हायरल

Arbaaz Khan Video: जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता अरबाज एका मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला आहे. हे कपल लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. अशामध्ये 'उमंग 2023' या कार्यक्रमात अरबाज खानने या अफवांवर उत्तर दिलं आहे.

Priya More

Arbaaz Khan Wedding News:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अरबाज खान (Arbaaz Khan) दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मलायका अरोरा (Malaika Arora), जॉर्जिया एंड्रियानीनंतर (Georgia Andriani) अरबाज खानच्या आयुष्यामध्ये नवीन व्यक्ती आली आहे. जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता अरबाज एका मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला आहे. हे कपल लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. अशामध्ये 'उमंग 2023' या कार्यक्रमात अरबाज खानने या अफवांवर उत्तर दिलं आहे.

सध्या सोशल मीडियावर अरबाज खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अरबाज खान 'उमंग 2023' या इव्हेंटच्या रेड कार्पेटवर वॉक करताना दिसला. अरबाज खानच्या अफेअरच्या चर्चांवर पापाराझींनी त्याला प्रश्न विचारले आणि त्याला दुसऱ्या लग्नासाठी शुभेच्छा देखील दिल्या. पापाराझींनी अरबाजला लग्नावरून चिडवायला सुरूवात केली. त्यांनी अरबाजला उद्या कुठे यायचे? ठिकाण काय आहे? असे प्रश्न विचारले. त्यावर अरबाजने त्यांना थँक्यू म्हटले. पण नंतर त्याने लगेच तोंडावर बोट ठेवले आणि पापाराझींना शांत राहण्यास सांगितले.

अरबाज खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी प्रश्न विचारला आहे की, 'खरंच अरबाज लग्न करतोय की या फक्त अफवा आहेत?' अरबाज खान या विकेंडला दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याच्या चर्चा होत आहेत. अशामध्ये त्याचा आताचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पण अरबाज खानच्या लग्नाबाबत त्याच्या कुटुंबीय किंवा त्याच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

५६ वर्षांचा अरबाज खान पुन्हा एकदा प्रेमात पडला आहे. गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अरबाजला नवं प्रेम मिळालं आहे. अरबाज खान यावेळी कोणत्याही अभिनेत्रीच्या प्रेमात पडला नाही. तर तो एका मेकअप आर्टिस्टच्या प्रेमात पडला आहे. या मेकअप आर्टिस्टचे नाव शौरा खान आहे. अरबाज आणि शौरा एकमेकांच्या प्रेमात खूपच सिरिअस असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही आपलं नांत पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

अरबाज खान आणि शौरा खान लग्न करण्याचा विचार करत आहे. अरबाज आणि शौराचं लग्न हे इंटीमेट वेडिंग असेल. या लग्नाला फक्त कुटुंबातील सदस्य, जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहतील, असे सांगितले जात आहे. अरबाज खान आणि शौरा खान यांची भेट त्यांच्या आगामी चित्रपट 'पटना शुक्'लाच्या सेटवर झाली होती. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT