Hua Main Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hua Main Song Out: ‘ॲनिमल’चं पहिलं रोमँटिंक गाणं रिलीज, रश्मिका आणि रणबीरच्या केमिस्ट्रीने लावली आग

Amimal Movie First Romantic Song Out: रश्मिका आणि रणबीरच्या लिपलॉक किसने तर सोशल मीडियावर आग लावली आहे.

Priya More

Animal Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटातील (Animal Movie) पहिलं गाणं रिलीज झाले आहे. 'हुआ मैं' या गाण्याला (Hua Main Song Out) प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळत आहे.

या गाण्यामध्ये रणबीर आणि रश्मिका रोमँटिंक अंदाजमध्ये दिसत आहेत. दोघांच्याही लिपलॉक किसने तर सोशल मीडियावर आग लावली आहे. या गाण्याच्या व्हिडीओला युट्यूबवर अवघ्या काही मिनिटांमध्येच चांगले व्ह्यूज मिळाले आहेत.

'हुआ मैं' या गाण्यातील रणबीर आणि रश्मिका यांच्यातील प्रेम आणि बॉन्डिंगने चाहत्यांचे मन जिंकले. दोघेही या गाण्यामध्ये पॅशनेट होऊन किस करताना दिसत आहेत. गाण्याची सुरूवात अशी होते की, दोघेही आपल्या कुटुंबीयांच्यासमोर एखादा गुन्हा केल्यासारखे बसले आहेत. त्यानंतर दोघेही कुटुंबीयांसमोरच किस करताना दिसतात. त्यानंतर ते दोघं एका विमानामध्ये दिसतात. याठिकाणी दोघंही रोमँटिंक अंदाजमध्ये दिसत आहेत. या संपूर्ण गाण्यामध्ये दोघंही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

'हुआ मैं' हे गाणं मनोज मुंताशीर यांनी लिहिलं आहे. तर प्रीतमने हे गाणं कम्पोज केलं आहे. हे गाणं रश्मिका आणि रणबीर दोघांच्याही चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या टीझरने आणि आता रिलीज झालेल्या पहिल्याच रोमँटिंक गाण्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता दोघांचेही चाहते हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दरम्यान, संदीप रेड्डी वंगा यांनी ‘ॲनिमल’ चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि संपादन केले आहे. रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्यासोबत तृप्ती डिमरी, अनिल कपूर आणि बॉबी देओलही या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार होता. मात्र पोस्ट-प्रॉडक्शनच्या कामात उशीर झाल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT