Bigg B On Rashmika Mandanna Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rashmika Mandanna Video: रश्मिका मंदान्नाच्या 'त्या' व्हिडीओवर भडकले बिग बी, कायदेशीर कारवाईची केली मागणी

Rashmika Mandanna Viral Video: रश्मिका मंदान्नाचा एक मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Priya More

Amitabh Bachchan On Rashmika Mandanna:

सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर सेलिब्रिटींचे एडिट केलेले अनेक फोटो आणि व्हिडीओ दररोज लीक होत असतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. अशामध्ये आता साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) एक मॉर्फ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रश्मिका मंदान्नाच्या या एडिटेड व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या व्हिडीओवर आता बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिग बी संतप्त होत त्यांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा एक व्हिडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या डीप नेक टाइट जिम वेअरमध्ये लिफ्टच्या आतमध्ये आल्याचे दिसत. रश्मिकाचा हा बोल्ड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहते संतापले. हा व्हिडीओ रश्मिकाचा आहे का की इतर कोणाचा हे याची माहिती करून न घेता नेटिझन्स त्यावर कमेंट्स करून संताप व्यक्त करू लागले. खरं तर व्हिडिओमध्ये दिसणारी रश्मिका नसून झारा पटेल आहे.

अमिताभ बच्चन यांनी रश्मिका मंदान्नाचा मॉर्फ (MORPH) केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाराजी व्यक्त करत तीव्र संतापही व्यक्त केला आहे. बिग बींनी याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या एक्स म्हणजेच ट्विटर अकाऊंटवर रश्मिकाचा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये 'होय, हे कायदेशीरदृष्ट्या मजबूत केस आहे.' असे लिहिले आहे. अमिताभ बच्चन यांनी रश्मिका मंदान्नासोबत 'गुडबाय' या चित्रपटामध्ये काम केले होते.

इतकेच नाही तर बिग बींनी व्हायरल व्हिडिओचे सत्य स्पष्ट करणारा आणखी एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये झारा पटेल दिसत आहे. क्लिपसोबत अमिताभ यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'माहिती' रश्मिका मंदान्नाच्या या व्हायरल व्हिडीओवर एका युजरने कमेंट्स करत तो फेक असल्याचे म्हटले आहे. या युजरने रश्मिकाच्या मॉर्फ व्हिडीओचा मूळ व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असे लिहिले की, 'भारतात डीपफेकशी निगडीत कायदेशीर आणि नियामक फ्रेमवर्कची तातडीने गरज आहे. रश्मिका मंदान्नाचा हा व्हायरल व्हिडिओ तुम्ही इन्स्टाग्रामवर पाहिला असेल, पण थांबा. हा झारा पटेलचा डीपफेक व्हिडिओ आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT