Bade Miyan Chote Miyan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bade Miyan Chote Miyan Movie: प्रतीक्षा संपली! 'बडे मियाँ छोटे मियाँ'चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू, अक्षय कुमार- टायगर श्रॉफमध्ये पुन्हा भांडण

Akshay Kumar And Tiger Shroff: अली अब्बास जफर यांचा हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. दोन्ही कलाकार या चित्रपटात मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारनसोबत टक्कर देण्यासाठी तयार आहेत.

Priya More

Bade Miyan Chote Miyan Advance Booking:

बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ सध्या त्यांचा आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. अली अब्बास जफर यांचा हा चित्रपट 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. दोन्ही कलाकार या चित्रपटात मल्याळम सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारनसोबत टक्कर देण्यासाठी तयार आहेत. सुकुमारनने या चित्रपटात विलनचीया भूमिका साकारली आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर आणि आलिया एफ देखील दिसणार आहेत.

IANS च्या रिपोर्टनुसार, ॲक्शन सीन्सपासून ते मनोरंजक सस्पेन्स आणि थ्रिलरपर्यंत 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवेल. चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. AAZ फिल्म्सच्या संयुक्त विद्यमाने वाशू भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाची कथा अली अब्बास जफर यांनी लिहिली आहे. त्याचसोबत या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले आहे. वासू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. जी पाहून असे दिसते की, टायगर श्रॉफने नवीन मोबाईल खरेदीसाठी अक्षय कुमारची 'अनोखी अट' थोडी गंभीरपणे घेतली आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अक्षय आणि टायगर पंचिंग बॅगवर बॉक्सिंगचा सराव करताना दिसत आहेत. यानंतर टायगर अक्षयकडे जातो. तो अक्षय कुमारकडे नवीन मोबाईल मागतो. हे ऐकून 'बडे मियाँ' अक्षय कुमार 'छोटे मियाँ' टायगरला म्हणतो, 'जोपर्यंत तू माझी छाती मोठी करत नाही तोपर्यंत मी तुला फोन देणार नाही." यानंतर, टायगर सरावात व्यस्त असलेल्या अक्षयच्या पाठीमध्ये जोरात पंच मारतो. ज्यामुळे अक्षय छाती पुढे करतो आणि फुगवतो. त्यानंतर टायगर अक्षयला म्हणतो आता छाती मोठी झाली. त्यानंतर अक्षय कुमार टायगरला मारतो. हा व्हिडीओ शेअर करत अक्षयने कॅप्शनमध्ये लिहिले की,'आमचे असेच चालू राहतील, पण आता वेळ आली आहे छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्यावर जाण्याची….'

अक्षय कुमार आणि टायगरच्या 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काल अवघ्या 5 तासांमध्ये 12 लाख तिकीटांची विक्री झाली. पूजा एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटाची शूटिंग अबू धाबी, जॉर्डन, लंडन आणि भारतामध्ये करण्यात आली आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. हा चित्रपट या सीझनमधील बिग तिकीट चित्रपट आहे. सध्याचे ट्रेंड असे सूचित करतात की, बुधवारपर्यंत हा चित्रपट 1 लाख तिकिटांची विक्री करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

'हे होणारच होतं' रेव्ह पार्टीत जावई पुरते अडकले, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

SCROLL FOR NEXT