Ajay Devgn Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ajay Devgn Networth: अजय देवगणचे खरे नाव तुम्हाला माहितीये?, दिसण्यावरून मिळायचे टोमणे; आज आहे कोट्यवधीचा मालक

Ajay Devgn Birthday: १९९१ मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अजय देवगणला त्याचा पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच लूकवरून बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या.

Priya More

Ajay Devgn Income:

बॉलिवूडचा सुपरस्टार अजय देवगण आज ५५ वर्षांचा झाला. अजय देवगण हा बॉलिवूडचा असा अभिनेता आहे ज्याने पहिल्याच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले. १९९१ मध्ये 'फूल और कांटे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अजय देवगणला त्याचा पहिला चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच लूकवरून बऱ्याच गोष्टी ऐकाव्या लागल्या होत्या. लूकमुळे तू कधीच यशस्वी होणार असे टोमणे त्याला मारले जात होते. अजय देवगणच्या वाढदिवसानिमित्त आज आपण त्याच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेणार आहोत...

अजय देवगणचा जन्म २ एप्रिल १९६९ रोजी दिल्लीला झाला. अजय देवगणचे वडील वीरू देवगण हे बॉलिवूडचे प्रसिद्ध अॅक्शन डायरेक्टर होते. अजय देवगणचे खरे नाव वेगळेच आहे. अजय देवगणचे लहानपणीचे नाव विशाल वीरू देवगण असे होते. सिनेसृष्टीत एन्ट्री करण्यापूर्वी त्याने नाव बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे नाव बदलून अजय देवगण ठेवले. अजय देवगणने कॉमेडी, सायको, सीरियस आणि अॅक्शन अशाप्रकारच्या अनेक भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त अजय देवगणने पंजाबी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

अजय देवगणने तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत १०० हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. अजय देवगण त्याच्या धाडसी स्टंटसाठी ओळखला जातो. तो चित्रपटांमध्ये स्वतःचे अनेक ॲक्शन सीन करतो. अजय देवगण एका चित्रपटासाठी ६० कोटींपेक्षा जास्त फी चार्ज करतो. त्याचसोबत तो ब्रँड एंडोर्समेंट्स, एनवाय चित्रपट, व्हीएफएक्स कंपनी आणि गुंतवणूकीतून कोट्यवधीची कमाई करतो. अजय देवगणचे वार्षिक उत्पन्न २५ ते ३० कोटी रुपयांच्या आसपास आहे. महिन्याला तो २ कोटींपेक्षा जास्त पैसे कमावतो.

'फूल और कांटे' चित्रपटातून डेब्यू करणारा अजय देवगण आज ५४० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. अजय देवगण बॉलिवूडचा असा सेलिब्रिटी आहे ज्याने पहिले खासगी जेट खरेदी केले आहे. अजय देवगणचे जुहूमध्ये फ्लॅट, मालगढी रोडवर आलिशान घर आणि लंडनमध्येही घर आहे. अजय देवगणला आलिशान कारची आणि घड्याळांची प्रचंड आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी आणि विंटेज कारचा समावेश आहे. 'गोलमाल अगेन' या चित्रपटातही त्याने आपल्या कार दाखवल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT