Sonam Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonam Kapoor: सोनम कपूरने नेसली आईची ३५ वर्षे जुनी घरचोला साडी, ट्रेडिशनल लूकने जिंकलं सर्वांचं मन

Sonam Kapoor Traditional Look: सोनम कपूरने आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी हा लूक केला होता. सोनम कपूरने यावेळी तिच्या आईची ३५ वर्षे जुनी साडी नेसली होती. अभिनेत्री या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या लग्नामध्ये सोनम कपूरच सर्वात जास्त लाइमलाइटमध्ये राहिली.

Priya More

Sonam Kapoor Photoshoot:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी देखील ती चर्चेत असते. आपल्या नवनवीन फोटोशूट, फॅशन सेन्स, ड्रेसिंग स्टाइल आणि आलिशान जीवनशैलीमुळे ती चर्चेत असते. नुकताच सोनम कपूरच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो व्हायरल होत आहेत. सोनम कपूरने आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी हा लूक केला होता. सोनम कपूरने यावेळी तिच्या आईची ३५ वर्षे जुनी साडी नेसली होती. अभिनेत्री या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. या लग्नामध्ये सोनम कपूरच सर्वात जास्त लाइमलाइटमध्ये राहिली.

सोनम कपूरने लाल रंगाची घरचोला साडी नेसली होती. ही साडी गुजरातची ट्रेडिशनल साडी आहे जी नवरी तिच्या लग्नाच्या वेळी नेसते. ही साडी तिच्या आईची असून ती ३५ वर्षे जुनी आहे. तिने तिच्या आईकडून ही साडी घेतली होती. सोनम कपूरने नेसलेल्या या साडीवर गोल्डन जरी वर्क करण्यात आले आहे. लाल रंगाची ही साडी तिने एम्बेलिश्ड ब्लाऊजसोबत कॅरी केली होती. गुजराती स्टाइलमध्येच तिने ही साडी नेसली होती.

सोनम कपूरने आपला हा ट्रेडिशनल लूक आणखी सुंदर बनवण्यासाठी हेअरस्टाइल करत केसामध्ये गजरा लावला होता. सोनम कपूरने लाइट मेकअप, कपाळावर बिदिया, कानात झुमके घालून आपला लूक परिपूर्ण केला होता. सोनम कपूरवर ही साडी खूपच सुंदर दिसत होती. महत्वाचे म्हणजे या साडीमध्ये तिचे सौंदर्य आणखी खुलून दिसत होते.

सोनम कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या नव्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या आईची ३५ वर्षे जुनी साडी घरचोला मी नेसली. ही साडी आणि ब्लाऊज मला दिल्याबद्दल मम्मा तुझे खूप खूप आभार.' सोनम कपूरच्या या लूकला तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत असून ते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर सक्रीय असणारी सोनम कपूर नेहमीच आपले यूनिक आणि ट्रेडिशनल लूकमधील फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. वेस्टर्न असो इंडियन वेअर असो सोनम कपूर यामध्ये खूपच सुंदर दिसते. तिच्या नवनवीन लूक आणि फोटोंची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सोनम कपूर आई झाल्यापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. सध्या ती आपला मुलगा वायूसोबत जास्तीत जास्त वेळ घालवते. सोनम कपूर शेवटी 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटात दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

No Overtime : ओव्हरटाईम टाळा, आरोग्य सांभाळा; आयटी कंपनीची कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट सिस्टिम

दापोडी ST कार्यशाळेतील भांडार खरेदी घोटाळा; दोषींवर कारवाई होणार; मंत्री प्रताप सरनाईकांचं आश्वासन

पुणे ग्रामीण जिल्ह्यात १५ दिवस प्रतिबंधात्मक आदेश; ५ पेक्षा जास्त लोकही जमू शकत नाहीत! नेमकी कशावर घातलीय बंदी?

Accident : महिला मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात; घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Ear Wax: कानातला मळ काढण्यासाठी माचिसची काडी वापरताय? आजच सवय सोडा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT