Shruti Haasan And Akshara Haasan Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shruti Haasan Trolled: धर्मेंद्र यांना पाहून श्रुती आणि अक्षरा हासन लागल्या हासू, VIDEO पाहून नेटिझन्सनी केलं ट्रोल

Shruti Haasan And Akshara Haasan Video: तमिळ सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन आणि अक्षरा हासन यांचे फोटोसेशन सुरू असताना धर्मेंद्र मध्येच आले. त्यामुळे त्यांच्या फोटोसेशन मध्ये व्यत्यय आला.

Priya More

Shruti And Akshara Haasan Laughing On Dharmendra:

बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) ८८ वर्षांचे झाले आहेत. या वयातही ते चर्चेत असतात आणि सक्रीय राहतात. बऱ्याच कार्यक्रमांना ते हजेरी लावतात. त्याचसोबत सोशल मीडियावर देखील त्यांची चर्चा होत असते. नुकताच धर्मेंद्र यांनी सुपरस्टार आमिर खानची मुलगी आयरा खानच्या रिसेप्शन पार्टीला हजेरी लावली. धर्मेंद्र यांनी धमाकेदार एन्ट्री करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. धर्मेंद्र एकटेच आले होते. यावेळी तमिळ सुपरस्टार कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन आणि अक्षरा हासन यांचे फोटोसेशन सुरू असताना धर्मेंद्र मध्येच आले. त्यामुळे त्यांच्या फोटोसेशन मध्ये व्यत्यय आला. यावेळी या दोघींनी जी काही रिअॅक्शन दिली त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावर या संदर्भातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. धर्मेंद्र आयरा खानच्या लग्नाच्या रिसेप्शन कार्यक्रमात पोहोचताच. त्यावेळी श्रुती हासन आणि अक्षरा हासनच्या फोटो शूटदरम्यान धर्मेंद्र एन्ट्री घेतात आणि संपूर्ण लाइमलाइट चोरतात. यावेळी श्रुती हासन आणि अक्षरा हासन हासू लागतात आणि त्या तिथून बाजूला पळून जातात. दोघींही एकमेकींना पकडून बाजूला पळून जाताना दिसतात. त्याचवेळी त्यांचे हसणे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करू लागले आहेत. काहींनी या दोघींना देखील ट्रोल केले आहे.

सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यासोबत कमल हासन यांच्या मुलींच्या या वागण्याने काही लोक खूप हसले. तर काहींनी त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'या आदरापोटी नाही तर हसत हसत पळून गेल्या.' तर, दुसऱ्या यूजरने लिहिले की 'त्या का पळत आहेत?' तर, तिसऱ्या यूजरने हासन बहिणींना सपोर्ट करत लिहिले की,'यांच्यामध्ये काय समस्या आहे? प्रत्येकजण त्यांना अस्न्मानित का करत आहेत? त्यांनी चांगले काम केले आहे. त्या फ्रेमपासून दूर गेल्या जेणेकरून धर्मेंद्र यांनाही फोटो क्लिक करता येईल. प्रत्येक गोष्टीवर इतके निर्णयक्षम आणि नकारात्मक असणे आवश्यक नाही.'

दरम्यान, आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांची लग्नानंतरची रिसेप्शन पार्टी पार पडली. या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. त्याचसोबत राजकीय नेते, बिझनेसमन, संगीत विश्वातील सेलिब्रिटी आणि क्रिडा विश्वातील मान्यवरांनी देखील हजेरी लावली. आयरा आणि नुपूरच्या पार्टीत रणबीर कपूर, सलमान खान, शाहरुख खान, गौरी खान, कतरिना कैफ, जुही चावला, हेमा मालिनी, रेखा, सायरा बानू, सुष्मिता सेन, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, अनिल कपूर, सचिन तेंडुलकर आणि साऊथ अभिनेता नागा चैतन्यसह अनेक स्टार्स दिसले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT