बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने (Rakul Preet Singh) नुकताच चित्रपट निर्माता जॅकी भगवनानीसोबत (Jackky Bhagnani) लग्न केले. २१ फेब्रुवारीला गोव्यामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी नव्या आयुष्याला सुरूवात केली. या कपलच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नानंतर हे जोडपे मुंबईमध्ये आले. त्यानंतर रकुल प्रीत सिंगने सासरच्या घरी पहिल्यांदाच खास पदार्थ तयार केला आहे. रकुलने गोड पदार्थ तयार केला ज्याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अभिनेत्री रकुल प्रीत सिंगच्या सासरच्या घरी चौका चारधाना समारंभ होता. ज्यामध्ये अभिनेत्रीने स्वतःच्या हाताने प्रत्येकासाठी शिरा बनवला होता. रकुल प्रीत सिंगने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरी सेक्शनमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये शिऱ्याने भरलेली वाटी दिसत आहे. हा फोटो शेअर करत रकुल प्रीतने कॅप्शनही लिहिले की, 'चौका चारधाना.' रकुल प्रीत सिंगने सासरच्या घरातील स्वयंपाकघरामध्ये पहिलाच पदार्थ तयार केला आहे. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चौका चारधाना हा समारंभ म्हणजे नववधू तिच्या सासरच्या घरी गेल्यानंतर पहिल्यांदाच स्वयंपाकघरामध्ये अन्न शिजवते. यावेळी नववधू स्वतःच्या हातांनी काहीतरी गोड पदार्थ तयार करते आणि कुटुंबातील सदस्यांना खायला घालते. रकुल प्रीत सिंगने लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या सासरच्या स्वयंपाकघरात शिरा तयार केला. रकुलने शिऱ्याने भरलेल्या वाटीचा फोटो शेअर केला आहे. दिसण्यावरून तर हा शिरा खूपच टेस्टी झाला असल्याचे वाटत आहे.
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी गोव्यातील एका लक्झरी रिसॉर्टमध्ये लग्न केले. जिथे 19 फेब्रुवारीपासून या कपलच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात झाली होती. हळदी, मेहेंदी आणि संगीत नाईटनंतर २१ फेब्रुवारीला रकुल आणि जॅकीचे दोन रितीरिवाजांनुसार लग्न केले. या जोडप्याने आधी आनंद कारज आणि नंतर सिंधी रितीरिवाजाने सात फेरे घेतले. शिल्पा शेट्टी, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, वरुण धवन, रितेश देशमुख, शिल्पा शेट्टी यांच्यासह अनेक बी-टाऊन स्टार्सनी रकुल प्रीत सिंग आणि जॅकीच्या लग्नाला हजेरी लावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.