Bollywood Actress Rakhi Sawant Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant Video: राखी सावंतचं असंही रूप, रस्त्यावर बसलेल्या गरजूला पाजलं पाणी, VIDEO व्हायरल होताच ट्रोलर्सचा निशाणा

Bollywood Actress Rakhi Sawant: अनेकांनी तिच्या या व्हिडिओला पसंती दिली आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.

Priya More

Rakshi Sawant Latest News:

बॉलिवूडची (Bollywood) 'ड्रामा क्वीन' राखी सावंत (Actress Rakhi Sawant) या नाही तर त्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच राखी सावंत उमराह करून परत आली. त्यानंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. पण राखी सावंतने त्यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. आता राखी सावंतचा एक असा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे ज्यामध्ये राखी सावंतचं वेगळं रूप सर्वांना पाहायला मिळाले आहे. अनेकांनी तिच्या या व्हिडिओला पसंती दिली आहे तर काहींनी तिला ट्रोल केले आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये राखी सावंत एका गरजू व्यक्तीला पाणी प्यायला देताना दिसत आहे. पाणी देत तिने या व्यक्तीला काहीतरी खायला देखील दिले आहे. या व्यक्तीने राखी सावंतला आशीर्वाद देखील दिले. राखी सावंतच्या हे चांगल्या कामाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या या व्हिडिओची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. राखीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिचे कौतुक केलं आहे. तर काही नेटिझन्सनी तिला ट्रोल देखील केलं आहे.

राखी सावंतचा हा व्हिडिओ पाहून काहींनी त्यावर कमेंट्स करत तिला ट्रोल केलं आहे. एका यूजरने कमेंटमध्ये असे लिहिले आहे की, 'राखी सावंत मनाने खूप चांगली आहे.', असं म्हणत तिचे कौतुक केले आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की, 'हा सर्व काही ड्रामा आहे.' आणखी एका यूजरने लिहिले आहे की, 'सर्व काही शो आहे.' तर, 'ती हे सर्व कॅमेऱ्यासमोर करत आहे.', असे म्हणत तिला ट्रोल केले आहे.

दरम्यान, राखी सावंत नुकतीच मक्का-मदिनाहून उमराह करून परतली आहे. राखी सावंत हिंदू असूनही तिने उमराह केल्यामुळे ट्रोल केले जात आहे. या ट्रोलर्सला राखी सावंतने उत्तर देताना असे सांगितले होते की, 'जी लोकं मुस्लिम असून सुद्धा मंदिरात जातात त्यांना कोणी काहीच बोलत नाही. पण जर एखादी हिंदू मुलगी काबी-शरीफला गेले तर लोकं गोंधळ घातलात.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 जुलै रोजी

Oral Medicines: सरकारचा नवा नियम; आता मेडिकलमधून कोणालाही मिळणार नाहीत ही औषधं, जाणून घ्या कारण

Sairat 2: 'सैराट २' येणार का? नागराज मंजुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाले, 'चांगली कथा असेल तरच...'

ITR Update : वेळेत आयटीआर भरला तरीही रिफंड अडकू शकतो; एका चुकीमुळे भरावा लागेल दंड

Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड! शिंदे ठाकरेंना पुन्हा धक्का देणार, १२ नगरसेवक गळाला

SCROLL FOR NEXT