Priyanka Chopra Saam TV
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra: बॉलिवूडची 'देसी गर्ल' मुंबईला येतेय..., प्रियांका चोप्रा MAMI फिल्म फेस्टिवल करणार होस्ट

MAMI Film Festival: प्रियांका भारतात राहत नसली तरी देखील ती सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहते.

Priya More

Priyanka Chopra Host MAMI Film Festival:

दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडपासून (Bollywood) ते हॉलिवूडपर्यंत (Hollywood) आपली वेगळी ओळख निर्माण करणारी बॉलिवूडची 'देसी गर्ल' अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नेहमी चर्चेत असते. प्रियांका चोप्रा लग्नानंतर भारतात नाही तर लॉस एंजेलिसमध्ये राहते. प्रियांका भारतात राहत नसली तरी देखील ती सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहते.

काही महत्वांच्या कामामुळे प्रियांका चोप्रा आपली बहीण परिणीती चोप्राच्या लग्नाला येऊ शकली नव्हती. पण आता प्रियांका चोप्रा भारातमध्ये येणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. प्रियांका चोप्राने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवरून तिच्या भारतात येण्याच्या चर्चांना वेग आला आहे.

निक जोनासची पत्नी आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा काही महिन्यांपूर्वी आपली मुलगी मालती मेरीसोबत भारतात आली होती. यादरम्यान प्रियांका चोप्रा आणि तिची मुलगी मालती मेरीचेही अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर प्रियांका चोप्रा आता पुन्हा भारतात येण्यासाठी सज्ज झाली आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये अभिनेत्रीने भारतीय पासपोर्ट आणि फ्लाइट बोर्डिंग हातात घेतलेले दिसत आहे. या स्टोरीसोबतच अभिनेत्रीने एक गोंडस इमोजीसह मुंबई लिहिले आहे.

Priyanka Chopra Insta Story

रिपोर्ट्सनुसार, प्रियांका चोप्रा MAMI म्हणजेच मुंबई फिल्म फेस्टिव्हलसाठी भारतात येत आहे. या इव्हेंटची ओपनिंग नाईट प्रियांका चोप्रा होस्ट करणार आहे. मुंबईतल्या नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रियांका चोप्रा भारतात आल्याच्या बातमीने तिचे चाहते खूपच खूश झाले आहेत. प्रियांका चोप्रा शेवटच्या वेळी भारतात आली तेव्हा तिच्यासोबत तिची मुलगी मालती मेरीही दिसली होती. पण यावेळी मालती मेरी तिच्यासोबत येणार आहे की नाही याची माहिती समोर आली नाही. प्रियंका चोप्रासोबतच मालती देखील भारतामध्ये यावी याची वाट प्रियांकाचे चाहते पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT