Poonam Pandey Saam Tv
मनोरंजन बातम्या

Poonam Pandey: स्वत:च्या निधनाच्या खोट्या अफवेनंतर पहिल्यांदाच स्पॉट झाली पूनम पांडे, देसी लूकमध्ये मंदिरात केली पूजा; VIDEO व्हायरल

Poonam Pandey Spotted First Time After Fake Death: पापाराझींनी पूनम पांडेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे. देसी लूकमध्ये पूनम पांडेने मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतले. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Priya More

Poonam Pandey Viral Video:

बॉलिवूडची (Bollywood) अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने (Poonam Pandey) काही दिवसांपूर्वी स्वत:च्याच निधनाची अफवा पसरवली होती. त्यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला होता. पण त्यानंतर तिने स्वत:च व्हिडीओ शेअर करत आपण जिवंत असल्याचे सांगितले होते. पूनम पांडेच्या या कृत्याचा अनेकांनी निषेध करत तिच्यावर टीका केली होती. या संपूर्ण प्रकरणानंतर आता पूनम पांडे पहिल्यांदाच स्पॉट झाली आहे. पापाराझींनी पूनम पांडेला आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले आहे. देसी लूकमध्ये पूनम पांडेने मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतले. सध्या तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

निधनाची खोटी बातमी पसरवल्यानंतर गुरुवारी पहिल्यांदाच पूनम पांडे सार्वजनिक ठिकाणी दिसली. पूनम पांडेला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कारण नेहमी वेस्टर्न लूक आणि विचित्र ड्रेसमध्ये दिसणारी पूनम पांडे देसी लूकमध्ये दिसली. तिचा हा देसी लूक पाहून सर्वजण चकीत झाले. नेहमीचे वेस्टर्न कपडे सोडून पूनम पांडेने पंजाबी ड्रेस परिधान केला होता. पूनम पांडेने पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. हलका मेकअप आणि मोकळे केस सोडून तिने लूक परिपूर्ण केला होता. पूनम पांडेचे या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पूनम पांडेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पूनम पांडे पंजाबी सूटमध्ये दिसत आहे. पूनमने आपल्या हातामध्ये एक ताट घेतले होते त्यामध्ये पुजेचे सर्व साहित्य ठेवले होते. ती एखाद्या मंदिरामध्ये जात आहे असे व्हिडीओवरून दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पूनम पांडेने गुरुवारी मुंबईतल्या अंधेरी येथील लक्ष्मी नारायण मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. पूनम पांडेचा यावेळीचा पारंपारिक लूक पाहून सर्वजण चकीत झाले.

यावेळी एका फोटोग्राफरने पूनमला विचारले, 'कशी आहेस?', त्यावर तिने हसून उत्तर दिले, 'एकदम फर्स्ट क्लास!' तेव्हा पापाराझींनी विनोद केला, 'तुम्ही आम्हाला घाबरवले.' पूनमने हसत उत्तर दिले, 'तू घाबरला होतास, मी अजिबात घाबरले नाही.' त्यानंतर ती पापाराझींना सांगते मी दर्शनासाठी आली आहे आणि ती मंदिरामध्ये निघून जाते. त्यानंतर पूनमने मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि पूजा केली दरम्यान, काही दिवसांपूर्वी पूनम पांडेच्या मॅनेजरने तिचा गर्भाशयाच्या तोंडाच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची खोटी बातमी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण २४ तासांतच पूनम पांडेने ती जिवंत असल्याचे उघड केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT