Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parineeti Chopra Video: ...अन् लग्न लागताच परिणीतीने आनंदाच्या भरात राघवला केलं किस, VIDEO आला समोर

Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding Video: हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Priya More

Parineeti Chopra Kisses To Raghav Chadha:

बॉलिवूड (Bollywod) अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) आपचे खासदार राघव चड्ढाशी (MP Raghav Chadha) नुकताच लग्न केले. परिणीती आणि राघवच्या लग्नाची (Parineeti And Raghav Wedding) अजूनही चर्चा सुरुच आहे. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे एकएक फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. नुकताच तिच्या लग्नातील एक जबरदस्त व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. या व्हिडीओला तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

लग्न लागल्यानंतर एकमेकांना वरमाला घातल्यानंतर परिणीतीने आनंदाच्या भरात राघवला किस केल्याचा हा व्हिडिओ आहे. परिणीती आणि राघवच्या लग्नाच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, परिणीती आणि राघव लग्नानंतर फोटो काढण्यासाठी उभे राहिलेले दिसत आहे. ते फोटोसाठी एकएक पोझ देत आहेत. अशामध्ये परिणीती राघवचा हात पकडते आणि त्याच्या जवळ जाते. राघवच्या गळ्यात पडून ती त्याच्या गालावर किस करते.

या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लग्न लागल्यानंतर फोटो काढत असताना परिणीतीचे फ्रेंड्स तिच्याशी आणि राघवशी काही तरी बोलताना दिसत आहेत. परिणीती या सर्वांना शांत रहाण्यास सांगते. instantbollywood या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला परिणीतीच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. 'परफेक्ट जोडी' असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे. या व्हिडीओला अवघ्या एका तासांत ८७ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

दरम्यान, लग्नानंतर परिणीती चोप्रा सोमवारी दिल्लीतील आपल्या सासरी आली. नव्या नवरीच्या स्वागतासाठी राघवच्या घराबाहेर धुमधडाक्यात परिणीतीचे स्वागत करण्यात आले. परिणीतीचा गृहप्रेवेशचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. लग्नानंतर आता परिणीती चोप्रा आणि राघव लवकरच रिसेप्शन पार्टी देणार आहे. दिल्लीमध्ये ही रिसेप्शन पार्टी होणार आहे. परिणीती आणि राघवच्या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकीय नेते मंडळी हजेरी लावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध, पुण्याच्या बालगंधर्व चौकात आंदोलन

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT