Parineeti And Raghav Mehndi Saam TV
मनोरंजन बातम्या

Parineeti And Raghav Mehndi: राघव आणि परिणीतीने गुरुद्वारामध्ये टेकला माथा, अभिनेत्रीच्या हातावर रंगली राघवच्या नावाची मेहंदी

Parineeti Chopra And Raghav Chadha Wedding: दिल्लीमध्ये साखरपुडा केल्यानंतर राघव आणि परिणीती राजस्थानच्या उदयपूरमध्ये दोघं लग्नगाठ बांधणार आहेत.

Priya More

Parineeti and Raghav Mehndi Photos:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Actress Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) काही दिवसांतच विवाहबंधनात अडकणार आहेत. राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा २४ सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये सात फेरे घेतील. सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.

राघव आणि परिणीतीच्या लग्नाआधीच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. अशामध्ये नुकताच राघव आणि परिणीतीने गुरुद्वारामध्ये जाऊन माथा टेकला. त्याचसोबत परिणीतीने आपल्या हातावर होणारा नवरा राघवच्या नावाची मेहंदी लावली. या मेहंदी सोहळ्याचा (Parineeti And Raghav Mehndi) खास फोटो समोर आला आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे सध्या चर्चेत असलेले जोडपे आहे. काही महिन्यापूर्वीच या दोघांचा दिल्लीमध्ये साखरपुडा पार पडला. इतर बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा परिणीतीचं लग्न हे सर्वांत हटके असणार यात काही शंका नाही. या दोघांच्या लग्नासाठी दोघांचे चाहते खूपच उत्सुक आहेत. महत्वाचे म्हणजे सर्वांचे लक्ष या शाही विवाहसोहळ्याकडे लागले आहे. दिल्लीमध्ये साखरपुडा केल्यानंतर राजस्थानच्या उदयपूरमध्ये दोघं लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नातील सर्व विधी शीख धर्मानुसार पार पडणार आहेत .

परिणीती आणि राघवच्या लग्नाच्या विधीला दिल्लीत सुरूवात झाली आहे. नुकताच दोघांचा मेहंदी सोहळा पार पडला. या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दिसत आहे की, राघव आणि परिणीती दोघेही गुरुद्वारामध्ये बसले आहेत. त्यांच्यासोबत दोघांचेही कुटुंबीय उपस्थित असल्याचे दिसत आहे. परिणीतीच्या हातावर राघवच्या नावाची मेहंदी लावलेली दिसत आहे.

मेहंदी सोहळ्याला राघव आणि परिणीती दोघांनीही मॅचिंग कलरची ड्रेसिंग केलेली दिसत आहे. दोघांनीही पेस्टल रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसत आहे. हा फोटो परिणीती चोप्राच्या फॅन क्लबने शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. दरम्यान, परिणीती आणि राघवच्या लग्नाच्या विधईला २३ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोघेही उदयपूरला रवाना होणार आहेत. त्याठिकाणी परिणीतीचा चुडा समारंभ होईल. त्यानंतर राघवची सेहराबंद असेल. २४ तारखेला दोघे विवाहबंधनात अडकतील. त्यानंतर ते सर्वांना रिसेप्शन पार्टी देणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: रिलस्टार ते डेप्युटी कलेक्टर! दुसऱ्या प्रयत्नात केली MPPSC क्रॅक; हर्षिता दवे यांचा प्रवास

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT