
कॅनडाचा प्रसिद्ध पंजाबी गायक शुभनीत सिंग (Shubhneet Singh) उर्फ शुभ वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला आहे. आपल्या गाण्यामुळे नेहमी चर्चेत राहणआरा २६ वर्षांचा शुभनीत त्याच्या ट्वीटमुळे चर्चेत आला आहे. शुभनीतने भारत-कॅनडाच्या वादादरम्यान खलिस्तानींना समर्थन केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याचे भारतामध्ये होणारे कॉन्सर्ट रद्द (Shubhneet Singh Concert Cancelled) करण्यात आले आहेत. ऐवढंच नाही तर त्याच्या या कृत्यामुळे क्रिकेटर विराट कोहलीने देखील त्याला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे. त्याचसोबत सोशल मीडियावर त्याला ट्रोल केले जात आहे.
शुभनीतची मुंबईत कॉन्सर्ट होणार होते. त्याचे कॉन्सर्ट याच महिन्यात होणार होते. मात्र कॉन्सर्टला भारतामध्ये येण्यापूर्वीच शुभनीत वादामध्ये सापडला आहे. शुभला भारतात जोरदार विरोध होत आहे. 'Cheaques' आणि 'Elevated' सारख्या गाण्यांनी प्रसिद्धी मिळविलेल्या या गायकाला त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या निषेधाला सामोरे जावे लागत आहे. त्याने हे ट्वीट काही काळापूर्वी केले होते. या वादानंतर शुभच्या आगामी कॉन्सर्टचे आयोजकही या कार्यक्रमातून माघार घेत आहेत.
कॅनडा स्थित पंजाबी गायक शुभला त्याच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे भारतात जोरदार विरोध होत आहे. या सोशल मीडिया पोस्टमध्ये शुभने पंजाब आणि जम्मू-काश्मीरला भारताच्या नकाशावरून हटवल्याचे दाखवले होते. इतकेच नाही तर भारतीय जनता युवा मोर्चाने (BJYM) गायकावर खलिस्तानच्या मागणीचे समर्थन केल्याचा आरोपही केला आहे.
गायकाच्या वादग्रस्त पोस्टनंतर भारतीय जनता युवा मोर्चाने त्याच्या कॉन्सर्टचे पोस्टर फाडले असून ते गायकाला मुंबईत गाण्याची परवानगी देणार नसल्याचेही सांगितले आहे. या विरोधानंतर हा शो आता वादात सापडला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, शुभच्या कॉन्सर्टचे आयोजन करणारी कंपनी बोटने माघार घेतली आहे. २३ ते २५ तारखेदरम्यान मुंबईत शुभच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई व्यतिरिक्त शुभचे भारतातील इतर अनेक राज्यांमध्ये कॉन्सर्ट होणार आहेत. कॉर्डेलिया क्रूझने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी शुभ मुंबई तसेच बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबाद येथे गाणी सादर करणार होता. आता या वादानंतर पंजाबी गायक शुभचे हे सर्व शो भारतात होणार की नाही हे पाहावे लागणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.