सध्या संपूर्ण देशामध्ये गणेशोत्सवानिमित्त (Ganeshostav 2023) आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. १९ सप्टेंबरला गणपती बाप्पाचे (Ganpati Bappa) आगमन झाले. बाप्पाची सेवा करण्यामध्ये गणेशभक्त (Ganeshbhakta) दंग आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी रांग लावली आहे.
अनेक सेलिब्रिटी आपल्या कुटुंबीयांसोबत अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानी आले होते. अभिनेत्री दिशा पाटनीने देखील यावेळी हजेरी लावली. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिला नेटिझन्सनी ट्रोल केले आहे.
मुकेश अंबानी यांच्या घरी गणपतीसाठी आलेले सर्व सेलिब्रिटी ट्रेडिशनल लूकमध्ये पाहायला मिळाले. अतिशय सुंदर अशी ड्रेसिंग स्टाईलमध्ये ते याठिकाणी आले होते. यावेळी दिशा पाटनीने सुंदर साडी नेसली होती. तरी देखील तिला नेटिझन्स ट्रोल करत आहेत. त्याचसोबत अनेकांनी तिच्यावर राग देखील व्यक्त केला आहे.
दिशा पाटनीचा लूक नेटिझन्सला अजिबात आवडला नाही. अंबानींच्या घरी गणपती बाप्पाच्या आरतीसाठी पोहचलेल्या दिशाने यावेळी पीच कलरची साडी नेसली होती. यावर तिने डीपनेक डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता. दिशाने यावेळी कंबरेच्या खाली साडी नेसली होती. त्याचसोबत तिचा ब्लाऊजचा नेक खूपच डीप होता. त्यामुळे ती या साडीमध्ये खूपच हॉट दिसत होती. पण एखाद्या सणाला आणि ते देखील गणपती बाप्पाच्या पूजेला अशा अवतारामध्ये दिशाचे जाणं सोशल मीडिया युजर्सला खटकले. त्यामुळेच दिशाला ट्रोल केले जात आहे.
यावेळी दिशा पाटनीसोबत अभिनेत्री मौनी रॉयने अंबानी यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी हजेरी लावली. यावेळी मौनी आणि दिशा दोघींनी कॅमेऱ्यासमोर पोझ दिल्या. एकीकडे मौनी रॉयने सिंपल पिंक कलरची साडी नेसून ट्रेडिशनल अंदाजमध्ये चाहत्यांना इम्प्रेस केले. तर दुसरीकडे दिशा पाटनीला तिच्या या हॉट लूकमुळे ट्रोल व्हावे लागले.
दिशा पाटनीच्या फोटोवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, 'अशा पारंपारिक कार्यक्रमात कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत, दिशाला कधी समजेल का?' आणखी एका यूजरने लिहिले की, 'गणेश चतुर्थीसारख्या प्रसंगी देखील दिशा पटानीला बिकिनीसारखे कपडे घालावे लागले.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'दिशा वेडी झाली आहे का, आम्ही भारतात राहतो, अशा खास प्रसंगी बाहेरचे लोकही भारतीय संस्कृतीचा आदर करतात.', अशा प्रकारच्या ट्रोल करत तिला ट्रोल करण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.