Nushrratt Bharuccha Instagram/ @nushrrattbharuccha
मनोरंजन बातम्या

Nushrratt Bharuccha: 'अजूनही मोठ्या सिनेमाची वाट पाहतेय', १७ वर्षांनंतरही नुसरत भरुचाचा संघर्ष सुरूच

Bollywood Actress Nushrratt Bharuccha: बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे राहून आणि बरीच मेहनत करून देखील अभिनेत्रीला अजून म्हणावा तसा चित्रपट मिळाला नाही.

Priya More

Nushrratt Bharuccha Struggles:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री नुसरत भरूचाला (Nushrratt Bharuccha) इंडस्ट्रीमध्ये १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण नुसरत बॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे जिला या इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी बरीच वर्षे लागली. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे राहून आणि बरीच मेहनत करून देखील अभिनेत्रीला अजून म्हणावा तसा चित्रपट मिळाला नाही.

अभिनेत्रीने नुकताच एका मुलाखतीमध्ये ' अजूनही माझा संघर्ष सुरुच आहे. अजून एका मोठ्या बॅनरकडून रोल ऑफर होण्याची वाट पाहत आहे.'असं सांगितलं. १७ वर्षे बॉलिवूडमध्ये काम करून देखील नुसरत भरुच्चा असं का म्हणते हे आज आपण जाणून घेणार आहोत....

नुसरत भरुचाला बॉलिवूडमध्ये १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. तिने 'लव्ह सेक्स और धोखा', 'प्यार का पंचनामा', 'ड्रीम गर्ल', 'जनहित में जारी', 'राम सेतू' आणि नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'अकेली' चित्रपटामध्ये काम केले आहे. या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या रुपात तिने काम केले आहे. असे असतना देखील नुसरत भरुच्चा म्हणते अभिनेत्री म्हणून माझा संघर्ष सुरूच आहे. नुकताच नुसरत अहमदाबादमध्ये आली होती. याठिकाणी तिने दिलेल्या मुलाखतीमध्ये हे वक्तव्य केले आहे.

आपल्या कारकिर्दीत अपारंपरिक भूमिका साकारणाऱ्या नुसरतने सांगितले की, 'एक अभिनेत्री म्हणून मी अजूनही संघर्ष करत आहे. मला वाटत नाही की मी अजून ठसा उमटवला आहे. मी अजूनही त्याच भूमिका, लक्ष आणि जागा यासाठी लढत आहे. कोणीतरी जो दिग्दर्शकाला फोन करून विचारू शकतो की 'मी का नाही?' मी खूप व्यावहारिक आणि शांत आहे. जर तुम्ही मला भूमिकेत का नाही घेतलं यामागचं कारण सांगितले तर मी ते स्वीकारू शकते. पण मला समस्या तेव्हा होते जेव्हा ते मला काहीच कारण सांगत नाहीत'

'जर एखाद्या दिग्दर्शकाला दुसर्‍या अभिनेत्रीबद्दल खूप खात्री असेल तर मी ते समजू शकते. कारण त्यांना कोणाला कास्ट करायचे आहे ते निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे. मला समस्या तेव्हा होते जेव्हा एखादा दिग्दर्शक सांगतो की, मला तुझ्यासोबत काम करायला आवडेल. पण त्याने मला कधीच कोणतीही भूमिका दिली नाही.'

नुसरतने पुढे सांगितले की, 'जेव्हा मी प्रेक्षकांशी संवाद साधते तेव्हा मला कळते की ते माझ्यावर खूप प्रेम करतात. त्यामुळे कदाचित मी तिथे छाप सोडली असेल, पण ट्रेडमध्ये नाही. तुम्ही माझी फिल्मोग्राफी पाहिली तर मी एकतर त्याच दिग्दर्शकांसोबत किंवा नवीन दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. मी अजूनही मोठ्या बॅनरकडून चांगला रोल ऑफर होण्याची वाट पाहत आहे.'

तसंच, 'लॉकडाऊन दरम्यान, फक्त एकच गोष्ट ज्याने आम्हाला स्वस्थ ठेवले ती म्हणजे ओटीटी. ओटीटीने लोकांना नोकऱ्या दिल्या आणि त्यासाठी मी त्याचे सदैव ऋणी राहीन. मात्र, चित्रपटाची जादू तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. मला असे जग हवे आहे जिथे प्रेक्षकांना दोन माध्यमांमधून निवड करावी लागणार नाही.', असं देखील नुसरतने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bombay Stock Exchange : स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवण्याची धमकी, बिल्डिंगमध्ये ४ RDX बॉम्ब ठेवल्याचा ई मेल, पोलीस अलर्ट मोडवर

Wardha : ५० हून अधिक पोपटांचा अचानक मृत्यू; शेतातील फवारणी केलेले खाद्य खाण्यातून विषबाधा

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

kitchen Tricks: भाजीला कट आणि गडद रंग हवा? मग हे खास स्वयंपाकघराचे ट्रिक्स वापरा

Head neck cancer signs: डोकं-मानेचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात होतात 5 मोठे बदल; सामान्य समजून 99% लोकं करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT