Malaika Arora Saam tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora: 'हिच्यासमोर उर्फी जावेदही फेल', मलायका अरोरा नव्या ड्रेसिंग स्टाइलमुळे ट्रोल

Malaika Arora Trolled: मलायकाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडत आहेत. पण दुसरीकडे या फोटोंमुळे ती ट्रोल होत आहे.

Priya More

Malaika Arora Photoshoot:

बॉलिवूडची (Bollywood) 'मुन्नी' अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या फॅशन सेन्स आणि नवनवीन ड्रेसिंग स्टाइलमुळे सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चेत असते. ५० व्या वर्षी देखील मलायका अरोरा खूपच सुंदर आणि हॉट दिसते. या वयातही ती बॉलिवूडच्या नव्या अभिनेत्रींना टक्कर देते.

मलायका अरोरा (Malaika Arora) आता चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या नव्या फोटोशूटमुळे. मलायकाचे हे फोटो पाहून सर्वांना धक्का बसला. मलायकाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडत आहेत. पण दुसरीकडे या फोटोंमुळे ती ट्रोल होत आहे. हे फोटो पाहून नेटिझन्स मलायकाची तुलना उर्फी जावेदसोबत करत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मलायका अरोरा कॅमेऱ्यासमोर आतापर्यंतच्या सर्वात हॉट लूकमध्ये दिसली. मलायका या फोटोंमध्ये खूपच बोल्ड दिसत आहे. या फोटोमध्ये मलायका अरोराने निऑन रंगाचा श्रग घातला आहे. अभिनेत्रीने हे श्रग समोरच्या बाजूने उघडे ठेवले आहे. मलायकाने वेगवेगळ्या रंगाच्या चमकत्या टिकल्यांनी तयार केलेला स्कर्ट घातला आहे. मलायका या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

फोटोंमध्ये मलायका तिचा बोल्ड लूक दाखवत आहे. तिने कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. मलायकाने या नव्या ड्रेसिंग स्टाइलमध्ये समोरच्या बाजूने आपले शरीर कसेतरी झाकले असल्याचे दिसत आहे. मलायकाने या लूकचा फोटो शेअर करताच लोकांच्या हृदयाची धडधड वाढली आहे. मलायकाने आपला लूक परिपूर्ण करण्यासाठी केस कलर केले आहेत. त्याचसोबत तिने निऑन कलरचे हिल्स कॅरी केले आहेत.

मलायकाने हे फोटोशूट अमित अग्रवालसाठी केले आहे. तिच्या या फोटोंना १ लाख ८० हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. अनेक सेलिब्रिटींनी अभिनेत्रीच्या लूकचे कौतुक केले आहे. तर अनेक युजर्सने तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. अनेकांनी तिची तुलना उर्फीसोबत केली असून तिला उर्फीची बहीण म्हणत आहेत. एका युजरने लिहिले की, 'म्हणून मलाही फोटोग्राफर बनायचे आहे.' दुसर्‍याने लिहिले की, 'द नेक्स्ट उर्फी.' तिसऱ्याने लिहिले की, 'उर्फीची नवीन बहीण.' चौथ्या युजरने लिहिले की, 'उर्फीसुद्धा हिच्यासमोर अपयशी ठरली.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - उत्तर सोलापूर तालुक्यातील दुष्काळी भागांची पाहणी अंतिम टप्प्यात

Accident News : नागपूरमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रेलरने चौघांना चिरडलं, पती- पत्नीसह चिमुकल्याचा जागीच मृत्यू

Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Monsoon Update : देशभरात पावसाने पाठ फिरवली, राज्यात ऑक्टोबर हिटने घाम फुटणार; कसे असेल आजचे हवामान? वाचा

Sunday Horoscope : डोळे झाकून विश्वास ठेवू नका; 6 राशींचे भाग्य उजळणार; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT